विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या जवळच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे साह्य एकरकमी व तत्काळ दिले जावे, असे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.Delhi govt. declares help for corona
कोरोनामुळे दिल्लीत २५ हजारांहून जास्त लोकांनी प्राण गमावले. ज्या कुटुंबांमधील कोणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यांच्या घरी जाऊन राज्य सरकारचे कर्मचारी मदतीची रक्कम देतील असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
ज्या मुलांनी कोरोना काळात आपले आई व वडील या दोघांनाही गमावले त्यांना वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत दरमहा अडीच हजार रुपये राज्य सरकारतर्फे देण्यात येतील. कोरोनात ज्या घरांतील कर्ता पुरुष मृत्यूमुखी पडला त्यांच्या कुटुंबीयांनाही दरमहा काही रक्कम सरकार देणार आहे.
आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी जे अर्ज येतील त्यात विनाकारण त्रुटी किंवा फटी काढू नका असे सक्त निर्देशही दिल्ली सचिवालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App