संत ज्ञानेश्वर यांच्या जन्मभूमी क्षेत्र आपेगाव पालखीला परवानगी नाही


विशेष प्रतिनिधी

पैठण : संत ज्ञानेश्वर माऊली यांचे जन्मस्थान पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगाव आहे. येथील ८४२ वर्षाची परंपरा असलेल्या पंढरपूर पालखी दिंडीला शासनाने परवानगी नाकारली आहे. त्या निषेधार्थ ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी अनेक वारकऱ्यांनी आत्मदनाचा इशारा दिला आहे . Birthplace of Saint Dnyaneshwar Apegaon Palkhi is not allowed

संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपान, मुक्ताई या चारही भावंडांची जन्मभूमी आणि भागवत धर्माचे व वारकरी संप्रदायाचे मूळ उगम स्थान आपेगाव आहे .याच आपेगावातून पंढरपूर दिंडी वारीची साडेआठशे वर्षाची परंपरा सुरू आहे.

कोरोनाच्या काळात आम्ही गेली दोन वर्षापासून माऊली दिंडी संदर्भात शासन स्तरावर ईमेल, पत्रक, निवेदन व समक्ष भेटून घेतली. परंतु महाराष्ट्र शासनाने आपेगाव येथील माऊली दिंडीचा यामध्ये समावेश केला नाही. त्यामुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर यांनी अनेक वारकऱ्यासह ज्ञानेश्वर माऊली मंदिर आपेगाव येथे सोमवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या सर्व प्रकाराला महाराष्ट्र शासन जबाबदार राहील, असे त्यांनी सांगितले .

  • आपेगाव येथील पालखीला परवानगी नाही
  • आपेगाव हे संत ज्ञानेश्वर यांचे जन्मस्थान
  • पंढरपूर पालखी दिंडीला८४२ वर्षाची परंपरा
  • आपेगाव हे भागवत धर्म, वारकरी संप्रदायाचे मूळ
  • दहा पालख्यात आपेगाव दिंडीचा समावेश नाही
  • दोन वर्षापासून शासनाकडे प्रयत्न, दाखल नाही

Birthplace of Saint Dnyaneshwar Apegaon Palkhi is not allowed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण