इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकी दूतावासावर रॉकेटचा मारा

विशेष प्रतिनिधी

बगदाद   : इराकची राजधानी बगदाद येथील अमेरिकी दूतावासावर रॉकेटचा मारा करण्यात आला. एकानंतर एक असे तीन रॉकेट डागण्यात आले. या हल्ल्याची माहिती इराकी सैनिक अधिकाऱ्याने ट्विटरवरुन दिली.US embassy attacked

इराकबरोबर सीरियातही अमेरिकी सैनिकांना लक्ष्य केले जात आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेने इराणच्या सशस्त्र बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्ले केले होते. यात चौघांचा मृत्यू झाला होता. हे हल्ले अमेरिकेने इराकी-सीरियाच्या सीमेवर केले होते.अमेरिकी दूतावासाच्या दिशेने डागण्यात आलेल्या रॉकेटची दिशा दूतावासाच्या ॲटी रॉकेट सिस्टिमने बदलली. त्यामुळे ते रॉकेट ग्रीन झोनवर पडले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. या हल्ल्यामागे इराणी सशस्त्र बंडखोराचा हात असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी अमेरिकी सैनिकांनी दूतावासाच्या परिसरात टेहेळणी करणाऱ्या ड्रोनला पाडले होते. तसेच इराकी हवाई तळावर तैनात असलेल्या अमेरिकी सैनिकांवर चौदा रॉकेट डागले होते. त्यात दोन जण जखमी झाले होते.

US embassy attacked

महत्त्वाच्या बातम्या