वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आत्तापर्यंत कुठल्याही शेतकरी अथवा सामाजिक आंदोलनांमध्ये टाकीवर चढून जाणे किंवा विजेच्या ट्रान्समिशन टॉवर वर चढून जाणे, मोबाईल टॉवरवर चढणे हे आपण बघितले आहे. पण राजकारणात निवडणुकीच्या तिकिटासाठी एका स्थानिक नेत्याचे विजेच्या ट्रान्समिशन टॉवरवर चढणे हे कदाचित पहिल्यांदाच घडले आहे. Delhi corporator Haseeb ul Hasan on the electricity transmission tower for the Aam Aadmi Party ticket
दिल्ली महापालिकेतील आम आदमी पार्टीचे माजी नगरसेवक हसीब उल हसन दिल्लीतील शास्त्री पार्क मेट्रो स्टेशन जवळ विजेच्या ट्रान्समिशन टॉवर वर चढले आहेत. आम आदमी पार्टीने महापालिका निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले त्यामुळे पुन्हा तिकीट दिले नाही तर ट्रान्समिशन टावर वरून उतरणारच नाही, अशी भूमिका त्याने टॉवर वरूनच जाहीर केली आहे.
दिल्ली: AAP के पूर्व पार्षद हसीब-उल-हसन शास्त्री पार्क मेट्रो स्टेशन के पास एक ट्रांसमिशन टावर पर चढ़ गए, जो कथित तौर पर आगामी एमसीडी चुनाव के लिए टिकट नहीं दिए जाने से नाखुश थे। स्थानीय लोग, पुलिस और फायर ब्रिगेड मौके पर मौजूद हैं। pic.twitter.com/V5qzQ74egL — ANI_HindiNews (@AHindinews) November 13, 2022
दिल्ली: AAP के पूर्व पार्षद हसीब-उल-हसन शास्त्री पार्क मेट्रो स्टेशन के पास एक ट्रांसमिशन टावर पर चढ़ गए, जो कथित तौर पर आगामी एमसीडी चुनाव के लिए टिकट नहीं दिए जाने से नाखुश थे। स्थानीय लोग, पुलिस और फायर ब्रिगेड मौके पर मौजूद हैं। pic.twitter.com/V5qzQ74egL
— ANI_HindiNews (@AHindinews) November 13, 2022
इतकेच नाही तर मला काही झाले तर आम आदमी पार्टीचे दुर्गेश पाठक आणि आतिशी हे नेते जबाबदार असतील कारण त्यांनी माझी सगळी डॉक्युमेंट्स ताब्यात घेतली आहेत, असा आरोप हसन यांनी केला आहे.
हसीब उल हसन हे टॉवर वर चढल्याचे पाहून तेथे बघ्यांची भरपूर मोठी गर्दी जमली असून पोलीस आणि फायर ब्रिगेड त्यांना टॉवर वरून वरून उतरवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App