विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या रकमेत आठ पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच हिट अँड रनमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १ एप्रिलपासून २ लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. Death in hit and run: Rs 2 lakh compensation now
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, अशा घटनांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेतही चार पटीने वाढ करण्यात आली आहे. आता १ एप्रिलपासून भरपाईची रक्कम ५०,००० रुपये होणार आहे.
२५ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेत मंत्रालयाने सांगितले की, या योजनेचे नाव ‘हिट अँड रन मोटर अपघातातील पीडितांना भरपाई योजना, 2022’ असे असेल आणि १ एप्रिल पासून लागू होईल.
मंत्रालयाने २ ऑगस्ट २०२१ रोजी मसुदा योजना अधिसूचित केली होती. हिट अँड रन अपघातात बळी पडलेल्यांसाठी या भरपाई योजनेचा उद्देश नुकसान भरपाईची रक्कम वाढवणे आहे. ही योजना नुकसानभरपाई योजना, १९८९ ची जागा घेईल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
विशेष म्हणजे याआधी हिट अँड रन अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सरकार केवळ २५ हजार रुपये भरपाई देत असे, तर अपघातातील मृतांना केवळ १२ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई मिळत होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App