महत्त्वाची बातमी : दोन हजाराच्या नोटा बदलण्याची तारीख वाढवली, RBIने जारी केले नवीन परिपत्रक

rbi report no fresh supply of 2000 notes in fy21 500 denomination highest in volume

जाणून घ्या, आता नोट बदलण्याची अंतिम तारीख काय असणार?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने यावर्षी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. यासाठी सरकारने 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत बँकांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्याची तारीख निश्चित केली होती. मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शेवटच्या दिवशी म्हणजेच आज (शनिवार) मोठा दिलासा दिला आहे. RBI ने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची तारीख वाढवली आहे.  Date of exchange of Rs 2000 notes extended RBI issues new circular

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटेबाबत नवीन परिपत्रक जारी केले आहे. आरबीआयने सांगितले की, दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची तारीख आता 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

महिला आरक्षण विधेयक मंजूर होताच विरोधकांचा महिलांमध्ये जातीवादी फूट पाडण्याचा डाव; मोदींचा घणाघात

आता लोक 7 ऑक्टोबरपर्यंत बँकांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलू शकतात. 7 ऑक्टोबरनंतर या नोटा फक्त RBI च्या 19 शाखांमध्ये जमा केल्या जातील, त्यामुळे सर्वसामान्यांना आपल्या जवळील २ हजार रुपयांच्या  नोटा नियोजित तारखेपूर्वी बँकांमध्ये जमा कराव्यात.

यापूर्वी बँकांमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्याची तारीख आज म्हणजेच शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. त्याच वेळी, एटीएममध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची वेळ आज मध्यरात्री 12 पर्यंत आहे. आता आरबीआयने नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्याची मुदत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. आरबीआयने म्हटले आहे की 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर राहतील. आतापर्यंत 3.42 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले आहेत.

Date of exchange of Rs 2000 notes extended RBI issues new circular

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात