जाणून घ्या, कुस्ती संघटनेच्या वादावर काय केले भाष्य?
विशेष प्रतिनिधी
चरखी दादरी : दंगल चित्रपट फेम बबिता फोगट यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे. त्यांनी या संदर्भातील आपली इच्छा व्यक्त करत पक्ष हायकमांडची इच्छा असेल तर मी लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे बबिता फोगट हरियाणातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि महिला विकास निगमच्या अध्यक्षा आहेत.Dangal fame Babita Phogat willing to contest upcoming Lok Sabha elections
बबिता फोगट यांनी चरखी दादरी येथे भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. किरण कलकल यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. बबिता यांनी दादरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि 24786 मतांसह तिसर्या क्रमांकावर त्या राहिल्या होत्या. नंतर सरकारने त्यांना हरियाणा महिला विकास निगमचे अध्यक्ष केले.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या बबिता यांना आता भाजपच्या तिकीटावर भिवानी-महेंद्रगड लोकसभा निवडणूक लढवायची आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बबिता म्हणाल्या की, हायकमांडने लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले तर मी तयार आहे.
कुस्तीच्या वादावरही केले भाष्य
बबिता यांनी ‘डब्ल्यूएफआय’च्या बाबतीत क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाचे कौतुक केले आणि खेळाडूंच्या बाजूने चांगला निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. विनेश फोगटचे नाव न घेता बबिता म्हणाल्या की, सर्व खेळाडूंनीही क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. अशा निर्णयांमुळे खेळाडूंचे भविष्य घडेल. क्रीडा मंत्रालयाने कुस्ती संघटना बरखास्त केली आहे. कुस्ती असोसिएशनच्या वादात बबिता यांची बहीण विनेश फोगटही विरोध करत आहे. विनेशनेही आपले पुरस्कार सरकारला परत केले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App