वृत्तसंस्था
नवी दिल्ली : क्रिप्टो करन्सीतून ड्रग्ज, मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवाद फंडिंग या कारवायांच्या जाळ्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका उत्पन्न होतो आहे. क्रिप्टो करन्सीचा गुंतवणूक पर्याय तरुणाईला मोहात पाडतो आहे. त्याच्या विशिष्ट जाहिरातींपासून तरुणाईला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या संदर्भातली एक बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. अर्थ मंत्रलय, रिझर्व बँकेचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.Cryptocurrency Drugs, Money Laundering, Terrorist Funding; Central government warns youth against dangersAfghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan’s puppet
भारतात वाढलेला क्रिप्टो करन्सीचा वापर, त्यातही तरुणाईला भुलविण्यासाठी वाढीव दावे करणाऱ्या जाहिराती याबाबत या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात येऊन त्याला आळा घालण्यास संबंधित महत्वपूर्ण उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपाययोजना लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. करोडो भारतीयांनी क्रिप्टो एसेट्समध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. ती तब्बल 600,000 एवढी आहे.
मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये ऋषिकेश देशमुख यांना अटकेपासून कोर्टाचा दिलासा नाही; सुनावणी 22 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलली
क्रिप्टो करन्सीचा वापर ड्रग्ज व्यापारात, मनी लॉन्ड्रिंगमध्ये, दहशतवाद फंडिंगमध्ये वाढल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली आहे. तरुणाई या पद्धतीने जर ड्रग्जच्या जाळ्यात ओढली जात असेल तर ती अधिक चिंतेची बाब आहे. बरोबर क्रिप्टो करन्सी सारख्या देशाची सीमा नसलेल्या अनियंत्रित करन्सीला आळा घालावा लागेल.
There was consensus also that the steps taken in the field of cryptocurrency & related issues by the Govt will be progressive & forward-looking. Govt will continue to pro-actively engage with the experts and other stakeholders: Govt sources — ANI (@ANI) November 13, 2021
There was consensus also that the steps taken in the field of cryptocurrency & related issues by the Govt will be progressive & forward-looking. Govt will continue to pro-actively engage with the experts and other stakeholders: Govt sources
— ANI (@ANI) November 13, 2021
त्यातून निर्माण होणाऱ्या बेकायदेशीर घटकांना प्रतिबंध करणे ही आता तातडीची आवश्यकता झाली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांची मदत घेऊन भारतामध्ये विशिष्ट कठोर उपाययोजना कराव्या लागतील, असे आग्रही मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले आहे. या उपाय योजनांवर या बैठकीत अनुकूल मत व्यक्त करण्यात आले आहे. चीनने क्रिप्टो करन्सीवर संपूर्ण बंदी लादली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्ज संदर्भात केंद्रीय तपास संस्थांनी जो तपास केला त्यातून काही “अंडरकरंट” लक्षात आले आहेत. यातला ड्रग्ज पेडलिंग, मनी लॉन्ड्रिंगचे विविध गुन्हे, दहशतवाद फंडिंग आणि क्रिप्टो करन्सी यांच्यातील “विशिष्ट कनेक्शन” हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. त्याला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.या बैठकीतून काही ठोस निर्णय अपेक्षित आहेत घेण्यात आले आहेत. ते लवकरच जाहीर करण्यात येतील असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App