मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये ऋषिकेश देशमुख यांना अटकेपासून कोर्टाचा दिलासा नाही; सुनावणी 22 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलली


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार मालकांकडून शंभर कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकार मधले गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये कोर्टाने अटकेपासून दिलासा दिलेला नाही. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 22 नोव्हेंबर पर्यंत कोर्टाने पुढे ढकलली आहे. दरम्यानच्या काळात अटकेपासून सुटका मिळावी ही मागणी कोर्टाने स्वीकारलेली नाही.Rishikesh Deshmukh arrested in money laundering case The hearing was adjourned until November 22अनिल देशमुखांना 15 नोव्हेंबर पर्यंत ईडीची कोठडी

दरम्यान, अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 15 नोव्हेंबर पर्यंत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई, काटोल आणि नागपूर मधील निवासस्थानांवर छापे घातल्यानंतर त्यांना मनी लॉन्ड्रिंग संदर्भात जे पुरावे आढळले ते ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केले.

ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला देखील चौकशी आणि तपासासाठी समाज पाठविले. परंतु तो अद्याप ईडीच्या अधिकार्‍यांसमोर हजर झालेला नाही. या पार्श्वभूमीवर ईडीने अनिल देशमुख यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 नोव्हेंबर पर्यंत ईडीच्या कोठडीत चौकशी आणि तपासासाठी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तत्पूर्वी अनिल देशमुख यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात नेऊन आणले होते. तेथे तपासणी झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी घेऊन त्यांची रवानगी डीडीच्या कोठडीत केली आहे.

Rishikesh Deshmukh arrested in money laundering case The hearing was adjourned until November 22

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण