अनिल देशमुखांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 15 नोव्हेंबर पर्यंत ईडीची कोठडी


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट आणि बार चालकांकडून शंभर कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकार मधले गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 15 नोव्हेंबर पर्यंत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. Anil Deshmukh remanded in ED custody till November 15 in money laundering case

ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई, काटोल आणि नागपूर मधील निवासस्थानांवर छापे घातल्यानंतर त्यांना मनी लॉन्ड्रिंग संदर्भात जे पुरावे आढळले ते ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केले.



ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला देखील चौकशी आणि तपासासाठी समाज पाठविले. परंतु तो अद्याप ईडीच्या अधिकार्‍यांसमोर हजर झालेला नाही या पार्श्वभूमीवर ईडीने अनिल देशमुख यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 नोव्हेंबर पर्यंत ईडीच्या कोठडीत चौकशी आणि तपासासाठी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तत्पूर्वी अनिल देशमुख यांना डीडीच्या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात नेऊन आणले होते. तेथे तपासणी झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी घेऊन त्यांची रवानगी डीडीच्या कोठडीत केली आहे.

Anil Deshmukh remanded in ED custody till November 15 in money laundering case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात