फरीदाबाद, हरियाणाचा रहिवासी असल्याची माहिती समोर
विशेष प्रतिनिधी
फरीदाबाद: हरियाणासाठी अंडर-19 क्रिकेट खेळलेला मात्र इंडियन प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केल्याचा दावा करणाऱ्या तरुणावर जुलै 2022 मध्ये ताज पॅलेस हॉटेलची 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Cricketers caught cheating Rishabh Pant and many hotel owners
मृणांक सिंग (२५) असे आरोपीचे नाव असून तो फरीदाबाद, हरियाणाचा रहिवासी आहे आणि त्याने फसवणूक केलेल्यांमध्ये क्रिकेटपटू ऋषभ पंत तसेच देशातील अनेक लक्झरी हॉटेल्सचे मालक आणि व्यवस्थापक यांचा समावेश आहे.
मृणांक सिंगने स्वत:ला कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी म्हणून दाखवून त्यांची फसवणूक केली होती. ताज पॅलेस हॉटेलच्या सुरक्षा संचालकाने गेल्या ऑगस्टमध्ये चाणक्यपुरी पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली.
मृणांक सिंग, ज्याने स्वतःला क्रिकेटर म्हणून ओळख दिली होती, तो 22 ते 29 जुलै 2022 या कालावधीत हॉटेलमध्ये 5,53,362 रुपयांचे बिल न भरता थांबला होता आणि न कळवता हॉटेल सोडले होते. पेमेंटबद्दल विचारले असता तो म्हणाला की, ते त्यांची कंपनी आदिदास करणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App