चंद्रपूरमध्ये मिशन ‘ऑलिम्पिक 2036 या लोगो’चे अनावरण देखील झाले.
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे आयोजित 67व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 चे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंत्री संजय बनसोडे, आ. रामदास आंबटकर, भारतीय दिग्गज खेळाडू हिमा दास, ललिता बाबर, मालविका बनसोड व अन्य मान्यवर उपस्थित होते. Sports teaches the attitude to bounce back after defeat
याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर व ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मिशन ‘ऑलिम्पिक 2036 या लोगो’चे अनावरण देखील झाले.
यावेळी फडणवीस म्हणाले, प्रत्येक व्यक्तीमध्ये खेळाडूवृत्ती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणताही खेळ हा केवळ जिंकण्यासाठी अथवा हारण्यासाठी खेळला जात नाही तर, पराभवानंतर खचू नये व जिंकल्यानंतर अतिउत्साह दाखवू नये ही गोष्ट आपल्याला खेळ शिकवते. खेळताना जय-पराजयाचा विचार न करता आपल्या देशाचा व राज्याचा विचार केल्यास सर्व खेळाडूंचा खेळ उंचावेल.
याचबरोबर चंद्रपूर ही वाघ व साग या दोघांची नगरी आहे. कोणत्याही ऋतूमध्ये या दोघांना काहीही फरक पडत नाही. वाघ व साग हे आपापल्या क्षेत्रातील राजे आहेत. त्यामुळे चंद्रपूर येथे स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे मी स्वागत करतो. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंच्या सेवेसाठी महाराष्ट्र सरकार तत्पर आहे. असंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App