वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत विरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या मुस्लिम लीग जम्मू-काश्मीरवर (मसरत आलम गट) केंद्र सरकारने बंदी घातली आहे. देशविरोधी कारवायांमुळे या संघटनेवर UAPA अंतर्गत बंदी घालण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहेMasrat Alam’s Muslim League banned in Jammu and Kashmir; Action under UAPA!!
मसरत आलम ग्रुपचे सदस्य जम्मू – काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये सामील आहेत. दहशतवादी कारवायांचे समर्थन आणि लोकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करतात. सरकारचा संदेश मोठा आणि स्पष्ट आहे की, आपल्या देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात काम करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही आणि त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई होईलच, असे अमित शाह यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
मसरत आलम तुरुंगात
मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर संघटनेची स्थापना मसरत आलम भट्ट यांनी केली होती. 2019 पासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने दहशतवादी फंडिंग प्रकरणी 50 वर्षीय मसरतविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 2010 मध्ये, काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर देशविरोधी निदर्शने केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. पब्लिक सेफ्टी ॲक्ट (PSA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.
मसरत आलमविरोधात 27 एफआयआर दाखल आहेत. त्याच्यावर पीएसए अंतर्गत 36 वेळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्च 2015 मध्ये, मसरत आलमची सुटका करण्यात आली, ज्यामुळे पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) च्या विरोधात निदर्शने सुरू झाली, जी त्यावेळी भाजपसोबत सत्ताधारी युतीमध्ये होती.
मसरत आलम भट्ट हा जम्मू – काश्मीरमध्ये दंगली भडकवण्याच्या अनेक आरोपाखाली 2015 पासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. श्रीनगरमध्ये सय्यद अली शाह गिलानी यांच्या स्वागतासाठी निघालेल्या रॅलीत पाकिस्तान समर्थक घोषणा देण्यात आल्या. तत्कालीन मुफ्ती मोहम्मद सईद सरकारने मसरतला देशद्रोह आणि राज्याविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या आरोपाखाली पुन्हा अटक केली होती.
यापूर्वी, मसरत आलमने 2010 मध्ये काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने करायला चिथावणी दिली होती, तेव्हा सुरक्षा दलांच्या कारवाईत 120 हून अधिक काश्मिरी तरुण मारले गेले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App