विशेष प्रतिनिधी
बंगळूर – बंगळूरमध्ये तिसऱ्या लाटेची भीती वाढली आहे. बंगळूर शहरात केवळ ११ दिवसांत ५४३ मुलांना संसर्गाची पुष्टी झाली आहे. त्यावर निर्बंध आणण्यासाठी सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांची बैठक बोलाविली असून संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखण्यात येणार आहेत. Cororna cases increasing in Banglore city
राज्यात अनलॉक जारी केल्यानंतर सर्वच व्यवहार सामान्य झाले आहेत. मुलांमध्ये कोविडचे प्रमाण वाढल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे. एका बंगळूर शहरात ११ दिवसांत ५४३ मुलांना कोविडची लागण झाली.
सरकार २३ ऑगस्टपासून ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची योजना आखत आहे. तशी यापूर्वीच घोषणा केली आहे. त्यातच मुलांना अद्याप लस न दिल्यामुळे पालक चिंतेत आहेत.मुलांच्या कोविड -१९ प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत.
जुलैपासून पॉझिटिव्हीटी रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नसल्याचे बंगळूर महापालिकेच्या आयुक्तांनी म्हटले आहे.’’शहरात ०-१८ वर्षे वयोगटातील ५४३ मुलांना १ ते ११ ऑगस्ट दरम्यान कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले. जुलैमध्ये ५१० मुलांना संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. ऑगस्टमध्ये ही संख्या वाढली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App