बंगळुरातील हिंदूविरोधी दंगलीतील 17 कट्टरवादी नेत्यांच्या मुसक्या आवळल्या


ऑगस्ट महिन्यात कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे झालेल्या दंगलीप्रकरणी डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या १७ नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. बंगळुरूमध्ये दंगल भडकाविण्याचे षडयंत्र त्यांनी केले होते.

 

विशेष प्रतिनिधी

 

बंगळुरू : ऑगस्ट महिन्यात कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे झालेल्या दंगलीप्रकरणी डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पॉप्युलर फंट ऑफ इंडियाच्या १७ नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. बंगळुरूमध्ये दंगल भडकाविण्याचे षडयंत्र त्यांनी केले होते.

Bangalore riots 17 extremist Leaders of Muslim groups arrested

बंगळुरू येथे ११ ऑगस्ट २०२० रोजी मोठी दंगल झाली होती. त्यानंतर सरकारने चौकशी आयोगाची स्थापना केली होती. आयोगाच्या अहवालात म्हटले आहे की ही दंगल भडकाविण्यासाठी नियोजनबध्दपणे षडयंत्र आखण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या परिसरात राहत असलेल्या हिंदूंना लक्ष्य करण्याचे ठरले होते. स्थानिक रहिवाशांचा यासाठी वापर करून घेण्यात आला. डेमॉक्रटीक पार्टी ऑफ इंडिया आणि पॉप्युलर फ्रंटच्या नेत्यांनी त्यांना भडकाविले. त्यांना सुरूवातीपासूनच दंगल भडकाविली जाणार असल्याची कल्पना देण्यात आली होती. त्यांनीच दंगलीमध्ये हिंसाचार केले.

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या एका आमदाराच्या पुतण्याने सोशल मीडियावर मोह्ममद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर ही दंगळ अधिक भडकली. मुसलमानांच्या जमावाने संपूर्ण बंगळुरूमध्ये दंगल पसरविली. पोलीसांच्या आणि खासगी वाहनांना आग लावण्यात आली. अनेक ठिकाणी लूटमार करण्यात आली. मुसलमानांच्या जमावाने पोलीस ठाण्यावरही हल्ला केला होता. त्यावेळी त्यांच्या हातात पेट्रोल बॉंब होते. याचा अर्थ दंगल नियोजनपूर्वक भडकाविण्यात आल्याचे स्पष्ट होते, असे अहवालात म्हटले आहे.

43 ठिकाणी छापे
बंगळूरूमध्ये सुमारे 43 ठिकाणी छापे टाकले. छापेमारीच्या कारवाईत एनआयएने एसडीपीआय / पीएफआयशी संबंधित सर्व वादग्रस्त साहित्य आणि तलवारी, चाकू आणि लोखंडी रॉड अशी अनेक शस्त्रे जप्त केली आहेत.

काँग्रेस आमदाराच्या पुतण्यामुळे दंगल
कर्नाटकचे कॉंग्रेस आमदार यांच्या पुतण्याने सोशल मीडियावर पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत कथित निंदनीय पोस्ट टाकली. त्यातून संपूर्ण बंगळुरूमध्ये दंगल भडकली होती.

Bangalore riots 17 extremist Leaders of Muslim groups arrested

11 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी कॉंग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या निवासस्थानी कट्टरपंथी जमले. जमावाने संपूर्ण घर उध्वस्त केले. यानंतर डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलिस ठाण्यात तोडफोड केली. त्याला पोलिसांनी उत्तर दिले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण