विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशात एका दिवसांत १,०३,५५८ नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली. एका दिवसातील ही सर्वाधिक रूग्णवाढ आहे. कोरोनाचा कहर चरणसीमेला पोहोचल्याचे हे द्योतक मानले जाते. त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. मागील वर्षी १७ सप्टेबर रोजी उच्चांकी ९७,८८९ बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली होती. Corona increases in whole country very fast
मागील वर्षी, बाधितांचा आकडा वीस हजारांवरून ९७,८८९ पर्यंत जाण्यास ७६ दिवसांचा कालावधी लागला होता. यावेळी फक्त पंचवीस दिवसांच्या अल्पकाळातच रूग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आकडेवारीनुसार, एकूण रूग्णसंख्येच्या ५.८९ टक्के इतकी सक्रिय रूग्णसंख्या असून बरे होण्याचा दर हा ९२.८० टक्के इतका आहे.
देशतील एकूण रूग्णसंख्या १,२५,८९,०६७ इतकी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. दिवसभरात ४७८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढून १,६५,१०१ इतकी झाली आहे.
देशातील एकूण १,६५,१०१ मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत तर, तमिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पंजाब या राज्यांतही परिस्थिती चिंताजनक आहे.
महत्त्वाची बातमी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App