जात, धर्म किंवा पैशाच्या आधारात नाही तर राष्ट्रवादाच्या मुद्यावर मतदान करा, असे दलितांना पटवून द्या. त्यासाठी दलितांसोबत चहा घ्या असे आवाहन उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी केले.Convince Dalits to vote on issues of nationalism, appeals Uttar Pradesh BJP president
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : जात, धर्म किंवा पैशाच्या आधारात नाही तर राष्ट्रवादाच्या मुद्यावर मतदान करा, असे दलितांना पटवून द्या. त्यासाठी दलितांसोबत चहा घ्या असे आवाहन उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी केले.
लखनौमध्ये पक्षाच्या वैश्य व्यापारी संमेलनात ते बोलत होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सिंह म्हणाले, 100 दलितांसोबत चहा घ्या आणि त्यांना समजावून सांगा की मते जात, पैसा किंवा धर्माच्या आधारावर दिली जात नाही. मतांच्या माध्यमातून राष्ट्र घडविण्याचे काम करायचे असते. त्यामुळे राष्ट्रवादाच्या आधारावर त्यांनी मतदान करावे.
उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा मतदारसंघांसाठी पुढील वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 312 विधानसभा जागांवर विजय मिळवला. समाजवादी पक्षाने 47, बसपाला 19 तर काँग्रेसने सात जागा जिंकल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App