बरे झाले काँग्रेस जिंकली; लडाख कारगिल मध्ये लोकशाही जिवंत राहिली!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लडाख कारगिल स्वायत्त पर्वतीय परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्या आघाडीने 26 पैकी तब्बल 22 जागांवर विजय मिळविला. भाजपला 2 जागांवर समाधान मानावे लागले आणि 2 अपक्ष उमेदवार विजयी झाले.Congress won; Democracy survives in Ladakh Kargil!!

जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवून राज्याचे विभाजन करून लडाख आणि जम्मू-काश्मीर हे 2 स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार केल्यानंतर स्थानिक पातळीवरची लडाख मधली ही दुसरी निवडणूक होती. या लडाख कारगिल स्वायत्त पर्वतीय परिषद निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांनी युती केली होती. भाजप स्वतंत्रपणे लढत होता. या निवडणुकीतल्या 26 जागांपैकी नॅशनल कॉन्फरन्स ला 12 जागा काँग्रेसला, 10 जागा, तर भाजपला 2 जागा मिळाल्या. 2 अपक्ष उमेदवार निवडून आले. पण या निवडणुकीच्या निकालातून लडाख – कारगिलमध्ये लोकशाही जिवंत असल्याचे दिसून आले.



जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवून त्या राज्याचे विभाजन केल्यानंतर काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी या पक्षांनी लोकशाही संपुष्टात आल्याचा कांगावा केला होता. जम्मू – काश्मीरच्या नागरिकांच्या स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. त्यांना मतस्वातंत्र्य मिळत नाही. त्यांच्या अविष्कार स्वातंत्र्याला केंद्र सरकारने नख लावले आहे, असे वेगवेगळ्या भाषेत पण तेच ते आरोप काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांचे नेते करीत होते.

पण आता प्रत्यक्ष लडाख कारगिल स्वायत्त पर्वतीय परिषदेच्या निवडणुकीत 4 ऑक्टोबरला मतदान झाले आणि 8 – 9 ऑक्टोबरला निकाल लागले. या निकालातून नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले. आता या विजयानंतर तरी निदान काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची लडाख कारगिलमध्ये लोकशाही जिवंत असल्याची खात्री पटेल का??, नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन मतदान केल्याचे या दोन्ही पक्षांना पटले का??, असे सवाल तयार झाले. पण त्यामुळे खरं म्हणजे एक प्रकारे बरेच झाले काँग्रेस जिंकली, लडाख कारगिल मध्ये लोकशाही जिवंत राहिली हे दिसून आले!!

Congress won; Democracy survives in Ladakh Kargil!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात