विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पश्चिम बंगालपाठोपाठ आता त्रिपुरामधूनही कॉग्रेस उखडली गेली आहे. एकेकाळचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत केवळ दोन टक्के मते मिळाली आहेत. कॉँग्रेसची जागा आता तृणमूल कॉँग्रेसने घेतली आहे.Congress was ousted from Tripura, followed by West Bengal, with only two per cent votes in the local body elections.
त्रिपुरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपाने सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळविले आहे. राज्यातील 14 शहरी संस्थांमध्ये एकूण 334 प्रभाग आहेत, त्यापैकी भाजपने 112 बिनविरोध जिंकले आणि मतदान झालेल्या 222 पैकी भाजपने 59 टक्के मतांसह 217 जागा जिंकल्या.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसला दोन टक्के मते मिळाली आहेत. डिसेंबर 2015 च्या ी निवडणुकीत कॉँग्रेसने २५ टक्के मते मिळवित १३ जागा मिळविल्या होत्या. यंदाच्या वेळी कॉँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. 2013 च्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत, ज्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीने(मार्क्सवादी) प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. काँग्रेसने सहा जागा जिंकत 36.5 टक्के मते मिळविली होती.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसला राज्यातील दोन जागांपैकी एकही जागा जिंकता आली नाही. परंतु त्याची मतसंख्या 15.2 टक्के इतकी होती. सीपीआय(एम) ने सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान कायम ठेवले होते. भाजपने 5.7 टक्के मते मिळविली आहेत.
त्रिपुरा कॉँग्रेसचे प्रमुख बिराजित सिन्हा म्हणाले, आमच्या पक्षाने अलीकडे अनेक चढ-उतार पाहिले आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये पक्ष सोडलेल्या पियुष बिस्वासचा संदर्भ देऊन ते म्हणाले राजकीय कौशल्य नसलेल्या व्यक्तीला मला पदभार सोपवण्यापूर्वी अध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र, आता आम्ही तळागाळात आमच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देत आहोत. भाजप मोठ्या प्रमाणात निवडणूक हेराफेरीमध्ये सहभागी आहे आणि लोकांना ममता बॅनर्जी यांचा खरा चेहरा अखेरीस दिसेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App