जनरल रावत यांच्या निधनाच्या निमित्तानेही चीनकडून भारताविरुध्द विषारी प्रचार, अपघाती निधनावर शोक व्यक्त करताना ओकली गरळ


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त करतानाही चीनकडून भारताविरुध्द विषारी प्रचार करत गरळ ओकण्यास सुरूवात झाली आहे.चीनच्या ग्लोबल टाईम्सने बिपिन रावत यांच्या अपघातामागे भारतीय सैन्यातील अनेक त्रुटी असल्याचे म्हणत रावत हे चीनविरोधी होते, अशी गरळ ओकली आहे.Mourning the accidental demise of General Rawat China spread poisonous propaganda against India.

रावत यांचे निधन म्हणजे भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाला मोठा झटका म्हटले आहे.हेलिकॉप्टर अपघातात भारताच्या संरक्षण प्रमुखाचा मृत्यू म्हणजे भारतीय सैन्यात अनुशासन आणि युद्धाच्या तयारीमध्ये कमतरता, त्रुटी असल्याचे दाखविले आहे.



ग्लोबल टाईम्सने दोन्ही देशांच्या सीमाभागात रावत यांच्या जाण्याने भारताच्या आक्रमकतेत काही फरक पडेल असे वाटत नाही, असे तज्ज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे. अपघाताची संभाव्य कारणे रशियन हेलिकॉप्टरमध्ये बिघाड नव्हता, तर भारताची मानवी चूक आहे. रशियाचे एमआय 17 हेलिकॉप्टर हे अतिशय अद्ययावत हेलिकॉप्टर आहे.

ताकदवान इंजिन आणि त्यावरील प्रणाली त्या हेलिकॉप्टरला विश्वासार्ह बनविते असे बिजिंगचे सैन्य विशेषज्ञ वेई डोंगक्सू यांनी ग्लोबल टाईम्सला सांगितले आहे. डोंगक्सू यांनी सांगितले की, भारतीय सैन्य अनेक प्रकारची हेलिकॉप्टर वापरते. रशिया, अमेरिकेतून आयात केलेली, भारतीय बनावटीची, परदेशातील तंत्रज्ञान वापरून भारतात बनविलेली अशी हेलिकॉप्टर आहेत. यामुळे हेलिकॉप्टरचा मेंटेनन्स आणि लॉजिस्टिक सपोर्टची कमतरता नक्की असणार.

Mourning the accidental demise of General Rawat China spread poisonous propaganda against India.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात