विशेष प्रतिनिधी
न्यूझीलंड : न्यूझीलंड देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे. 2008 नंतर ज्या व्यक्ती जन्मलेल्या आहेत त्यांना इथून पुढे सिगारेट आणि तंबाखू सारखे प्रॉडक्ट्स विकत घेता येणार नाहीयेत. पुढच्या वर्षीपासून हा कायदा लागू करण्याचा न्यूझीलंडचा देशाचा विचार चालू आहे.
Cigarettes banned in New Zealand The law will come into force from 2022
हेल्थ मिनिस्टर आयेशा वेरल यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आम्हाला तरुण पिढीला व्यसनाधीन होण्यापासून थांबवायचे आहे. देशातील बऱ्याच डॉक्टर्स आणि आरोग्य तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. याच्यामुळे निकोटीन आणि तंबाखू सारखे पदार्थचे सेवन कमी करणे बंधनकारक असणार आहे. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
या निर्णयानंतर देशातील लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
काँग्रेसचे खासदार के.टी.एस्. तुलसी यांची मागणी ; म्हणाले – दारू, तंबाखू, गुटखा यांप्रमाणे कर भरून अमली पदार्थ सेवन करण्याची अनुमती द्या !
काही लोकांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हा अतिशय चांगला कायदा लागू केला जात आहे. याच्यामुळे आमचे बरेच पैसे देखील वाचतील आणि आमचे आरोग्यदेखील चांगले राहण्यास मदत होईल. तर दुसऱ्या बाजूला लोक असेही म्हणत आहेत की, हा कायदा लागू करणे अतिशय चुकीचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App