काँग्रेसने छत्तीसगडमधील खनिज संपत्तीचा ‘ATM’प्रमाणे केला वापर – पंतप्रधान मोदी

खोटा प्रचार आणि सर्रास भ्रष्टाचार ही छत्तीसगड काँग्रेसची ओळख असल्याचेही मोदींनी म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

रायगड  : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी राज्यातील रायगड जिल्ह्यात पोहोचून रोड शो केला, तसेच विजय शंखनाद रॅलीला संबोधित केले. पंतप्रधानांनी येथे ६ हजार ३५० कोटींचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. Congress used the mineral wealth of Chhattisgarh like ATM PM Modi

जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, सध्या संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे, अशावेळी काही दिवसांपूर्वीच आपल्या प्रत्येकाचा आनंद द्विगुणित झाला आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच आपल्या शास्त्रज्ञांनी  भारताचे चांद्रयान अशा ठिकाणी पोहोचवले जेथे जगातील कोणताही देश अद्याप पोहोचू शकला नाही. ज्याप्रमाणे छत्तीसगडमध्ये म्हटले जाते की ‘छत्तीसगढ़िया सबले बढ़िया’, त्याचप्रमाणे आज जग भारताचे चांद्रयान सर्वोत्तम असल्याचे म्हणत आहे.

जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आणि म्हटले की, ”काँग्रेस ज्या पद्धतीने घोटाळ्यांचे राजकारण करते, त्याद्वारे केवळ नेत्यांची तिजोरी भरली जाते. छत्तीसगडचे काँग्रेस सरकार गरीब कल्याणात मागे पडले असले तरी भ्रष्टाचारात सतत पुढे जात आहे. जरा विचार करा, कुणी शेणखतामध्येही भ्रष्टाचार करत असेल तर त्याची मानसिकता काय असेल? ”

छत्तीसगडच्या खनिज संपत्तीच्या गैरवापरावरून काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”काँग्रेसने राज्याच्या खनिज संपत्तीचा एटीएम प्रमाणे वापर केला. खोटा प्रचार आणि सर्रास भ्रष्टाचार ही छत्तीसगड काँग्रेसची ओळख आहे. अनेक वर्षांनी संधी आली आहे, ती पुन्हा येणार नाही,  म्हणून जमेल तसे लुटण्याची ही वेळ आहे, असे त्यांचे (काँग्रेसचे) म्हणणे आहे. काँग्रेस आणि भाजपाचा ट्रॅक रेकॉर्ड तुमच्यासमोर आहे.”

Congress used the mineral wealth of Chhattisgarh like ATM PM Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात