वृत्तसंस्था
चंदिगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांची प्रतिष्ठा कमकुवत होताना दिसत आहे. कुमारी शैलजा यांचे समर्थकही पराभवाचे खापर हुड्डा गटावर फोडत आहेत. यानंतर काँग्रेस हायकमांड प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत आहे.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता काँग्रेस मोठे बदल करण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत आहे. काँग्रेस सिरसाच्या खासदार कुमारी शैलजा यांना मोठी जबाबदारी देऊ शकते. त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. आतापर्यंत केसी वेणुगोपाल ही जबाबदारी सांभाळत आहेत.
29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाल्यानंतर या चर्चांना आणखी वेग आला. सहसा अशा याद्या केसी वेणुगोपाल यांनीच जारी केल्या होत्या. यावेळी कुमारी शैलजा यांच्या हस्ते यादी जाहीर करण्यात आली. त्यात फक्त हरियाणाचे राज्यसभा खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांचे नाव होते.
तिकीट वाटपात हुड्डा यांचा प्रभाव
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 37 जागा मिळाल्या. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणूक लढवली होती. तिकीट वाटपापासून स्टार प्रचारकांच्या रॅलीपर्यंत हुड्डा यांचा प्रभाव अधिक होता. कुमारी शैलजा समोर कुठेच दिसल्या नाही. काँग्रेस हायकमांडनेही हरियाणातील पराभवाचे हे प्रमुख कारण मानले आहे. या गटबाजीमुळे संघटना कमकुवत झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App