नाशिक: Manoj jarange महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठा गाजावाजा करून निवडणुकीच्या रणमेदानात आलेले मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी प्रत्यक्ष निवडणूक लढण्यापासून माघार घेतली. त्यांनी आपली तलवार लढाईपूर्वीच म्यान केली. त्याचे खापर त्यांनी मुस्लिम आणि दलित नेत्यांवर फोडले. मुस्लिम आणि दलित नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी दिली नाही त्यामुळे एकाच जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही म्हणून आपण माघार घेत असल्याचे मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.Manoj jarange
जरांगे यांच्या या निर्णयाचा त्यांच्या अनुयायांना प्रचंड धक्का बसला असून मनोज जरांगे यांनी प्रचंड गाजावाजा करून जे मराठा आरक्षणा आंदोलन उभे केले त्यातून त्यांनी काय साध्य केले??, ते नेमके कोणाच्या मार्गदर्शनाखाली आणि कोणाच्या विरोधात कशासाठी काम करत होते??, याची चर्चा जरांगे यांच्याच अनुयायांमध्ये सुरू झाली. या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि त्यानंतरच्या माघारीतून मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीचा पुढचा 20 दिवसांचा अजेंडा सेट करून टाकला, तो म्हणजे जातीजातींमध्ये फूट विरुद्ध हिंदूंची एकजूट!!
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला. त्यात देखील मनोज जरांगे यांचे मास्टर माईंड सर्वाधिक लाभार्थी ठरले. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कधी नव्हे एवढे 80 % यश मिळाले. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 पैकी 8 उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची लाभार्थी ठरली. कारण अख्खी निवडणूक जातीवर गेली होती.
परंतु गेल्या 4 महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या सर्व नद्यांमधून भरपूर “राजकीय पाणी” वाहून गेले. महायुतीतले सगळे घटक पक्ष धीमेपणाने काम करून आस्ते आस्ते सावरले. भाजपने पुन्हा एकदा संघाची साथ घेतली किंबहुना संघाने भाजपला साथ दिली. त्यातून मायक्रो लेव्हलचे प्लॅनिंग सुरू झाले. योगी आदित्यनाथांचे “बटेंगे तो कटेंगे” हे नॅरेटिव्ह खऱ्या अर्थाने प्रभावी ठरत गेले. याचा अर्थ महाविकास आघाडीने मनोज जरांगे यांच्या साथीने जो महाराष्ट्रात जातीजातींमध्ये फूट हा नॅरेटिव्ह सेट केला होता, तो हिंदूंची एकजूट या नॅरेटिव्ह मधून हाणून पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्याचा अर्धा टप्पा मनोज जरांगे यांच्या आजच्या माघारीतून सिद्ध झाला.
एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही, याचा “साक्षात्कार” मनोज जरांगे यांना मास्टर माईंडच्या सल्ल्यातून झालाच होता. पण त्यांनी चाचणी करून जे काही 20 – 25 उमेदवार दिले असते, त्यांनी महाविकास आघाडीलाच फटका दिला असता, असे जाणवल्यानंतर मास्टर माईंडने जरांगेंची राजकीय हवा काढून घेण्याचा निर्णय घेतला असावा अशा अटकळी बांधल्या गेल्यात त्यामध्ये बरेच तथ्य दिसते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App