Rashmi Shukla : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या बदलीचे आदेश; काँग्रेसच्या मागणीवर निवडणूक आयोगाची कारवाई!!

Rashmi Shukla

वृत्तसंस्था

मुंबई : Rashmi Shukla  महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधात काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाने या तक्रारीची ताबडतोब दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले.Rashmi Shukla

INC आणि इतर पक्षांच्या तक्रारींवर कारवाई करून, भारतीय निवडणूक आयोगाने DGP रश्मी शुक्ला यांची तत्काळ प्रभावाने बदली करण्याचे आदेश दिले आहेत आणि मुख्य सचिवांना निर्देश देऊन त्यांचा पदभार पुढील सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवला आहे.



 

डीजीपी महाराष्ट्र म्हणून नियुक्तीसाठी उद्या 5 नोव्हेंबर दुपारी 1.00 वाजेपर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवण्याचे निर्देशही मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात येऊन निवडणूक आढावा बैठक घेताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यापूर्वी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेच्या वेळी अधिकाऱ्यांना निःपक्षपातीपणे काम करण्याचा इशारा दिला होता.

काँग्रेसने रश्मी शुक्ला यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आणि शुक्लांच्या बदलीचे आदेश काढले.

Maharashtra Director General of Police Rashmi Shukla transfer order; Action of Election Commission on the demand of Congress!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात