विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “जितनी आबादी उतनी हिस्सेदारी!!” असा नवा राजकीय फंडा काँग्रेस खासदार राहुल गांधींनी काढला असला तरी तो फक्त बोलण्यापुरता असल्याचेच काँग्रेसच्या उमेदवार यादीतून सिद्ध झाले आहे. आधी पितृपक्षाला घाबरून थांबविलेल्या विधानसभा निवडणुकीतल्या पहिल्या याद्या काँग्रेसने नवरात्रीच्या पहिल्या माळेला आज जाहीर केल्या. पण त्यातल्या एकूण 229 उमेदवारांपैकी फक्त 5 मुस्लिमांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.Congress: Only 5 Muslims out of 229 candidates in Madhya Pradesh, Chhattisgarh, Telangana; Hanuman of Congress against Shivraj!!
काँग्रेसने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाना विधानसभा निवडणुकीची पहिल्या याद्या आज जाहीर केल्या. यातली उमेदवार संख्या 229 आहे. त्यात फक्त 5 मुसलमाना उमेदवार आहेत आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडामधून काँग्रेस नेते कमलनाथ निवडणूक लढवणार आहेत, तर बुधनी मतदारसंघात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात रामायण या लोकप्रिय मालिकेतील हनुमानाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेते विक्रम मास्ताल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. मास्ताल हे लोकप्रिय अभिनेते आहेत. 2008 मध्ये आलेल्या रामायण मालिकेत मास्ताल यांनी हनुमानाची व्यक्तिरेखा साकारली होती. हिंदुत्वाचा पुरस्कार आणि रामानामाचा जयघोष करणाऱ्या भाजपसमोर आता मालिकेतील हनुमानाचे आव्हान उभे केल्याचे राजकीय समाधान काँग्रेसने मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
मध्य प्रदेशात इंदौर-1 या मतदारसंघातून काँग्रेसने भाजपचे उमेदवार कैलास विजयवर्गीय यांच्या विरोधात संजय शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. शुक्ला यांची ही पारंपारिक सीट आहे. तसेच ते या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे कैलास विजयवर्गीय यांना विजयासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार असल्याचं चित्र आहे.
बघेल लढणार
छत्तीसगडमधील उमेदवारांची पहिली यादीही जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पाटनमधून लढणार आहेत. बघेल हे पाटनचेच विद्यमान आमदार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव हे अंबिकापूर येथून निवडणूक लढणार आहेत. छत्तीसगडमधील 90 जागांसाठी निवडणूक होत आहे.
तेलंगानातून रेड्डी
काँग्रेसने तेलंगाना प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए रेवंत रेड्डी यांना कोडनगल विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. तेलंगानात विधानसभेच्या 40 जागा आहेत.
पहिल्या यादीत फक्त 5 मुस्लिम
जितनी आबादी उतनी हिस्सेदारी ही घोषणा राहुल गांधींनी दिली आहे, पण 3 राज्यांमध्ये काँग्रेसच्या पहिल्या 229 उमेदवारांच्या यादीत फक्त 5 मुसलमान आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एका मुस्लिम व्यक्तीला तिकीट दिले आहे, तर तेलंगनामध्ये तीन मुस्लिम व्यक्तींना तिकीट देण्यात आले आहे. म्हणजे तीन राज्यातील 229 उमेदवारांपैकी फक्त 5 मुस्लिम उमेदवारांना काँग्रेसने तिकीट दिलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, ही पहिली यादी आहे. अजून दुसरी आणि तिसरी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे यात मुस्लिमांना अधिकाधिक तिकीट दिला जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. सध्या जाहीर झालेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदारांनाच तिकिट देऊन काँग्रेसने सेफ गेम खेळल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App