मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!

Mirwaiz changed Omar Farooq

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवून तिथे सरकारने सकारात्मक पातळीवर जे बदल घडवून आणलेत, त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. आत्तापर्यंत काश्मीर मधून फुटीरतावाद आणि दहशतवादाच्या बौद्धिक समर्थनाच्या गोष्टी पुढे येत होत्या आणि त्या मीरवाइज उमर फारूक याच्यासारख्या व्यक्तीच्याही तोंडून नेहमी बाहेर येत होत्या, त्या आता बंद झाल्या आहेत. उलट मीरवाइज मोहम्मद उमर फारूक यांची भाषा बदलू लागली आहे.  Mirwaiz changed Omar Farooq

हमास विरुद्ध इस्रायल संघर्षात मीरवाइज उमर फारूक यांनी चक्क इस्रायलची बाजू देखील उचलून धरली आहे. पॅलेस्टिनींना त्यांचे हक्क जरूर मिळाले पाहिजेत. पण इस्रायलच्या नागरिकांचे हक्क देखील डावलता कामा नयेत, अशी भाषा मीरवाइज उमर फारूक यांच्या तोंडी आली आहे. पॅलेस्टाईन आणि इजराइल यांच्यातल्या वादावर शांततापूर्ण मार्गाने कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. त्यासाठी जगातल्या सर्व देशांनी संयम राखूनच प्रयत्न केले पाहिजेत. पॅलेस्टिनींना त्यांची भूमी मिळाली पाहिजेच, पण त्याचबरोबर पॅलेस्टिनी आणि इस्रायली त्या भूमीवर शांततेतही नांदले पाहिजेत, असे वक्तव्य मीरवाइज उमर फारूक यांनी केले.

हे तेच मीरवाइज उमर फारूक आहेत, जे युपीए सरकारच्या काळात सरकारी पाहुणे म्हणून दिल्ली किंवा इस्लामाबाद मध्ये जायचे आणि काश्मिरी फुटीरतावादाचे समर्थन करायचे. अनेकदा दहशतवादी कृत्यांना त्यांनी “बौद्धिक कव्हर फायर” देखील दिल्याचे जम्मू – काश्मीरच्या नजीकच्या इतिहासात नमूद आहे.

पण जम्मू – काश्मीर मधून 370 कलम हटले. मीरवाइज उमर फारूक यांचा सरकारी पाहुण्याचा दर्जा मोदी सरकारने संपुष्टात आणला आणि फुटीरतावादाचे समर्थन केल्याबद्दल त्यांच्यावर खटला भरला. त्या खटल्यात त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. 4 वर्षांनंतर ते तिहारमधून बाहेर आले आणि त्यांचे मत शांततेकडे झुकले. त्यांना आता इस्रायली नागरिकांना देखील हक्क आहेत आणि त्यांची जपणूक केली पाहिजे, याची जाणीव झाली आहे.

यापूर्वी “पॅलेस्टिनी हक्क” यापेक्षा वेगळी कोणतीच भाषा ते बोलत नसत. पण आता त्यांची भाषा बदलून इस्रायली हक्काचाही त्यात समावेश झाला आहे, हे मीरवाइज उमर फारूक यांच्या वक्तव्यातले वेगळेपण आहे.

Mirwaiz changed Omar Farooq

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात