विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 18 व्या लोकसभेत स्वतःचे संख्याबळ वाढवून आलेल्या काँग्रेस आणि INDI आघाडीचे दुटप्पी धोरण संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेत उघडे पडले. खासदारकीची शपथ घेताना असदुद्दीन ओवैसी “जय पॅलेस्टाईन” म्हणाले, तेव्हा काँग्रेस आणि INDI आघाडीचे नेते मूग गिळून गप्प बसले, पण खासदारकीची शपथ घेताना भाजपचे नेते छत्रपाल गंगवार यांनी “जय हिंदूराष्ट्र” अशी घोषणा देताच हे घटनाबाह्य आहे, असे काँग्रेसचे सगळे खासदार ओरडत सुटले. या खासदारांनी लोकसभेत गदारोळ केला. खासदारांच्या शपथविधी समारंभादरम्यान काँग्रेस आणि INDI आघाडीचा हा दुटप्पीपणासमोर आला.Congress on Owaisi jai Palestine slogan & Jai Hindu Rashtra immediately burst into flames
Sworn in as member of Lok Sabha for the fifth time. Inshallah I will continue to raise issues of India’s marginalised with sinceritypic.twitter.com/OloVk6D65B — Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 25, 2024
Sworn in as member of Lok Sabha for the fifth time. Inshallah I will continue to raise issues of India’s marginalised with sinceritypic.twitter.com/OloVk6D65B
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 25, 2024
याची कहाणी अशी :
असदुद्दीन ओवेसी हैदराबाद मधून पाचव्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यांनी हंगामी सभापतींसमोर लोकसभेत खासदार पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते भारतमाता की जय म्हणाले नाहीत. उलट त्यांनी जय भीम, जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन अशा घोषणा दिल्या. असदुद्दीन ओवैसी यांनी “जय पॅलेस्टाईन” अशी घोषणा दिल्यानंतर भाजपच्या खासदारांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर हंगामी सभापतींनी ओवैसी यांची ती घोषणा कामकाजातून काढून टाकली. पण यावेळी झालेल्या हंगाम्याच्या वेळी काँग्रेस आणि INDI आघाडीचे खासदार लोकसभेत शांत बसून होते. त्यांना असदुद्दीन ओवैसी यांनी दिलेली “जय पॅलेस्टाईन” ही घोषणा खटकली नाही. त्या खासदारांनी त्या घोषणेचा विरोधही केला नाही.
पण त्यानंतर भाजपचे नेते छत्रपाल गंगवार यांनी खासदारकीची शपथ घेतली आणि त्यांनी “जय हिंदूराष्ट्र” अशी घोषणा दिली. गंगवार यांनी ही घोषणा देताच काँग्रेस आणि INDI आघाडीच्या खासदारांचे पित्त खवळले. त्यांचे “राज्यघटना प्रेम” अचानक जागे झाले आणि गंगवार यांनी दिलेली “जय हिंदूराष्ट्र” ही घोषणा घटनाबाह्य असल्याचा आरडाओरडा या खासदारांनी केला. ज्या काँग्रेस आणि INDI आघाडीच्या खासदारांना “जय पॅलेस्टाईन” ही घोषणा आक्षेपार्ह किंवा घटनाबाह्य वाटली नाही, त्याच खासदारांना “जय हिंदूराष्ट्र” ही घोषणा मात्र लगेच घटनाबाह्य वाटली आणि त्यांनी लोकसभेत आरडाओरडा केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App