विशेष प्रतिनिधी
मुंबई : Hussain Dalwai विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बेबनाव सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाने आगामी महापालिकेच्या निवडणुका लढणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. अशा परिस्थितीत आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारले, ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक असल्याचे हुसेन दलवाई म्हणाले. शिवसेनेने आता पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.Hussain Dalwai
शिवसेना पक्षाची झाल्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा मुद्दा कायम धरला होता. त्यानंतर शिवसेनेने मराठीचा मुद्दा काही प्रमाणात बाजूला सारत हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेतला. याच एका मुद्द्यावर महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेनेची युती झाली. त्यानंतर राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत देखील आली. दरम्यान याच मुद्द्यावरून आता हुसेन दलवाई यांनी शिवसेनेला टार्गेट केले आहे.
काय म्हणाले दलवाई?
शिवसेनेने मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारले ही त्या पक्षाची सर्वात मोठी चूक आहे, अशी टीका हुसेन दलवाई यांनी केली. शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारले आणि आरएसएसला मदत केली, असा आरोप देखील त्यांनी केला. शिवसेनेच्या त्या चुकीमुळे मुंबईचे गुजरातीकरण होत आहे, असेही दलवाई म्हणाले. शिवसेनेने आता पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घ्यावा, असा सल्ला देखील हुसेन दलवाई यांनी दिला. शिवसेना पक्षाने आधीचा मराठी मुद्दा सोडल्यामुळेच महाराष्ट्रावर संकट ओढावले आहे. मुंबई शहरात मराठी माणसावर अन्याय होत आहे, असेही दलवाई यांनी म्हटले आहे.
दरम्यान हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून युतीची सत्ता आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये देखील खटके उडाले. त्यानंतर 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले. तर सर्वाधिक आमदार संख्या असताना देखील भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. मात्र, अडीच वर्षांनी 2021 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि शिवसेनेत मोठी फुट पडली. एकनाथ शिंदेंच्या उठावामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि युतीचे सरकार सत्तेत आले. आता हुसेन दलवाई यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा मराठी लोकांचा मुद्दा हाती घेण्याचा सल्ला दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App