पुण्यातील सिग्नलची व्यवस्था स्मार्ट सिटीकडून पुणे पोलिसांकडे, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन

Yogesh Kadam

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे शहरात सिग्नलची व्यवस्था स्मार्ट सिटीकडून पुणे पोलिसांकडे सोपविण्यात यावी या प्रस्तावाचा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करेल असे आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. Yogesh Kadam

पुणे शहरांमध्ये नोव्हेंबर २०२४ पासून आतापर्यंत जे गुन्हे घडलेले आहेत त्याबाबत पुणे पोलीस आयुक्तालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. योगेश कदम आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घडलेल्या गुन्ह्यांच्या कारवाईबाबत सादरीकरण केले. यावेळी घडलेल्या घटनांवर गांभीर्याने लक्ष देत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वाच्या सूचना देत उपायोजना करण्याबाबत सांगितले आहे.

पुण्यातल्या वाहतूक कोंडी संदर्भातला आहे. यामध्ये सिग्नलची व्यवस्था, पुणे शहरांमध्ये स्मार्ट सिटीकडून पुणे पोलिसांकडे सोपवण्यात यावी हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे, बऱ्याच वर्षापासून हा प्रयत्न चाललेला आहे. तर तो प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे मी पाठपुरावा करतो असं कदम यांनी सांगितले.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, अशा सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या. नवीन दंड सहितेनुसार, महिलांच्या विरोधात जे हिंसाचार आणि अत्याचाराचे गुन्हे आहेत ते B Summery केले जातात म्हणजे ते रद्द केले जातात. परंतु, दंड संहितेत म्हटलेले आहे की असे कुठलेही गुन्हे रद्द करता कामा नयेत, त्याचे पुनर्निरीक्षण करा, असे त्यांनी सांगितले.

शहरामध्ये बाराशे-तेराशे पॉक्सोची प्रकरणे आहेत. त्यामधल्या मुलींना प्रत्येक तारखेच्या आधी कळवणे क्रमप्राप्त असते की, त्यांची तारीख आहे आणि त्यांना कोणत्या अडचणी आहेत का? त्या प्रत्येक मुलीला दर महिन्यात त्यांच्या तारखेच्या वेळेला पुणे पोलीस फोन करतात कोणती अडचण असेल तर, गृह भेट देतात. यावर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुलींची उमेद वाढवण्याच्या दृष्टीने काही साहित्य उपसभापती कार्यालय आणि स्त्री आधार केंद्राच्यावतीने देण्याची इच्छा असल्याचे व्यक्त केले

पुणे शहराची वस्ती वाढत आहे म्हणून महिला दक्षता समितीच्या ज्या पोलीस स्टेशन पुरत्या मर्यादित आहेत तशा न ठेवता बीट स्तरावरती महिला दक्षता समिती कराव्यात असे सुचवले. पोलीस निधी हा जो उपक्रम आहे तो शाळा, कॉलेजपर्यंत मर्यादित आहे. तर जे बीटचे कॉन्स्टेबल्स आहे ते त्या परिसरामध्ये सातत्याने जातच असतात त्यांनी महिलांची समिती बीट स्तरावरती करावी याला पण पोलीस आयुक्त यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल ते सकारात्मक होते. या खेरीज ड्रग्से प्रमाण कमी झाले पाहिजे, वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या अपघातासाठी आणि सायकल प्रेमींसाठी सुरक्षिततेची पावलं उचलली गेली पाहिजेत,” असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

पुढे ऑनर किलिंग सारख्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “ऑनर किलिंगची एकही घटना पुणे शहरात घडलेली नाही आहे. परंतु, ऑनर किलिंग हे टायटल गुन्ह्यांमध्ये असावं जेणेकरून एखादी जरी ऑनर किलिंगची घटना घडली तर त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल.”

Signal arrangement in Pune from Smart City to Pune Police,  Yogesh Kadam assured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात