वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस आणि दलाली या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जणू एक महाराणी आहे, अशी जोरदार टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. Congress is the queen of corruption, BJP president Nadda’s attack; Congress, brokerage, two sides of the same coin
नड्डा म्हणाले, देशात आजपर्यंत झालेल्या संरक्षण साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. काँग्रेस आणि दलाली या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे या माध्यमातून स्पष्ट होते. जे.पी. नड्डा हे उत्तराखंड दौऱ्यावर आले आहेत.चमोली येथे सोमवारी त्यांनी शहीद सन्मान यात्रेत भाग घेतला. ते म्हणाले, २०१४ पूर्वी वीस वर्षे सरंक्षणाकडे काँग्रेसने अक्षम्य दुर्लक्ष केले.
संरक्षण साहित्य खरेदी केली नाही. आमचे जवान शस्त्राशिवाय कसे लढू शकतील, याचा विचार काँग्रेसने केला नाही. अहिंसेच्या स्वप्नाळू जगात जगणाऱ्या काँग्रेसने जवानांच्या जीवाची काळजी घेतली नाही. अशा खडतर परिस्थितीत जवान लढा देत राहिले आणि काँग्रेस त्याकडे सतत दुर्लक्ष करत राहिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App