‘काँग्रेसने पंचायतींकडे दुर्लक्ष केले, मात्र आता…’, पंचायती राज परिषदेच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं विधान!


पंचायत राज व्यवस्था हा भारतीय लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले

विशेष प्रतिनिधी

हरियाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) हरियाणामध्ये प्रादेशिक पंचायती राज परिषदेचे  व्हर्चुअली उद्घाटन केले. पंचायत राज व्यवस्था हा भारतीय लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. Congress ignored Panchayats  PM Modi’s statement at Panchayati Raj Parishad meeting

तसेच विकसित भारत घडवण्यात आपल्या पंचायती महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना आणखी मजबूत करण्याची गरज आहे, असेही मोदींनी सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळात गावे दुर्लक्षित होती.

मोदी म्हणाले की, ‘आज देश एकजुटीने, दृढनिश्चयाने, विकसित भारताच्या निर्मितीसाठी अमृतकालच्या संकल्पांच्या पूर्ततेसाठी पूर्ण उत्साहाने पुढे जात आहे. कोणत्याही क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याची ताकद जिल्हा पंचायतींमध्ये आहे. अशा स्थितीत भाजपाचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हा सर्वांची भूमिका खूप मोठी ठरते.

काँग्रेसवर निशाणा

काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, अमृतकालच्या २५ वर्षांच्या प्रवासात गेल्या दशकांतील अनुभवही लक्षात ठेवावे लागतील. खेड्यापाड्यात पंचायत राज व्यवस्था लागू करणे किती आवश्यक आहे, हे स्वातंत्र्यानंतर चार दशके काँग्रेसला समजले नाही. यानंतर निर्माण झालेली जिल्हा पंचायत व्यवस्था काँग्रेसच्या काळात तशीच खितपत पडून राहिली.

काँग्रेसच्या राजवटीत पंचायत राज संस्थांना बळकट करण्यासाठी कधीही ठोस प्रयत्न केले गेले नाहीत, असा आरोप पंतप्रधानांनी केला. बहुतांशी कार्यवाही केवळ कागदावर आणि आकडेवारीतच मर्यादित होती. जम्मू-काश्मीर हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे, असेही मोदी म्हणाले.

Congress ignored Panchayats  PM Modis statement at Panchayati Raj Parishad meeting

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात