राहुल गांधीनंतर ट्विटरने आता काँग्रेस आणि त्यांच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या खात्यांना लॉक केल्याबाबत निवेदन जारी केले आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइटने म्हटले की, आम्ही आमचे नियम निष्पक्ष पद्धतीने लागू करतो. ट्विटरच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, आमच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा शेकडो ट्विट्सवर आम्ही आमच्या वतीने कारवाई केली आहे. भविष्यातही आम्ही आमच्या नियमांनुसार काम करत राहू. Congress Handles Blocking Row Twitter Says Rules Are Enforced Judiciously Impartially For Everyone
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधीनंतर ट्विटरने आता काँग्रेस आणि त्यांच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या खात्यांना लॉक केल्याबाबत निवेदन जारी केले आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइटने म्हटले की, आम्ही आमचे नियम निष्पक्ष पद्धतीने लागू करतो. ट्विटरच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, आमच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा शेकडो ट्विट्सवर आम्ही आमच्या वतीने कारवाई केली आहे. भविष्यातही आम्ही आमच्या नियमांनुसार काम करत राहू.
वैयक्तिक माहिती इतरांपेक्षा अधिक धोकादायक
ट्विटरने म्हटले की, काही वैयक्तिक माहिती इतरांपेक्षा अधिक धोकादायक आहे. आमचे ध्येय कोणत्याही व्यक्तीच्या गोपनीयतेचे संरक्षण करणे आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे आहे. आम्ही लोकांना ट्विटरचे नियम समजून घेण्यासाठी आणि काटेकोरपणे पालन करण्यास प्रोत्साहित करतो. याशिवाय इतर कुणाकडूनही नियमांचे उल्लंघन झाले तर त्याची तक्रार करा.
आढावा घेतल्यानंतर कारवाई
अकाउंट लॉक केल्याबद्दल स्पष्टीकरण देताना ट्विटरने म्हटले की, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने त्यांना सतर्क केले आहे. पोस्ट केलेल्या चित्रातून अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या नातेवाइकांची ओळख उघड होत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आम्ही आमच्या स्वतःच्या अटी आणि धोरणांनुसार याचे पुनरावलोकन केले. हे भारताच्या कायद्याच्याही विरुद्ध होते. त्यानंतर आम्ही या खात्यांवर कारवाई केली.
ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले, “आमच्या मदत केंद्रात नमूद केल्याप्रमाणे, जर एखादे ट्विट ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आणि ज्याने ते पोस्ट केले त्या व्यक्तीने अद्याप ट्वीट काढले नाही, तर आम्ही ते तुम्हाला नोटीससह हाइड करत असतो, शिवाय ते ट्वीट डिलीट करेपर्यंत अकाउंट लॉक राहते.’
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गेल्या आठवड्यात दिल्लीच्या नांगला गावात एका मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात झालेल्या वादानंतर राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांच्यासोबतचा एक फोटोही ट्विटरवर पोस्ट केला. त्यानंतर ट्विटरने कारवाई केली.
दरम्यान, काँग्रेसने ट्विटरवर मोदी सरकारच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप केला. काँग्रेसने म्हटले की, ट्विटर सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. देशभरातील आमच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची 5,000 हून अधिक खाती त्यांनी आधीच ब्लॉक केली आहेत. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, आम्ही केंद्र सरकार किंवा ट्विटरच्या भीतीने गप्प बसणार नाही.
Congress Handles Blocking Row Twitter Says Rules Are Enforced Judiciously Impartially For Everyone
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App