वृत्तसंस्था / प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी इस्लामी कट्टरतावादी संघटना PFI आणि तिच्या उपसंघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर काँग्रेसला “ऑल फॉर्म ऑफ कम्युनॅलिझम” आठवला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी एक ट्विट करून पीएफआय वरील बंदी वर भाष्य केले आहे. पीएफआय ही इस्लामी कट्टरतावादी संघटना आहे. केंद्र सरकारने त्या संघटनेच्या घातपाती कारवाया लक्षात घेऊन तिच्यावर बंदी घातली आहे. जयराम रमेश यांनी काढलेल्या पत्रकात मात्र इस्लामी कट्टरता वादाचा उल्लेख नाही. त्या उलट काँग्रेस कायमच “सर्व प्रकारच्या धर्मांधते विरोधात” लढा देणारी संघटना आहे. या लढाईत बहुसंख्यांक – अल्पसंख्यांक यात काँग्रेस भेद करत नाही, असे जयराम रमेश यांनी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे. Congress General Secretary in-charge Communications Jairam Ramesh issues a statement
जयराम रमेश यांच्या या पत्रकात “बहुसंख्यांक” हा शब्द आवर्जून वापरण्यात आला आहे. काँग्रेस पक्ष 2014 नंतर निवडणुकीतील “बहुमताला” “बहुसंख्यांकवाद” असे संबोधत आला आहे. काँग्रेसला जोपर्यंत सत्तेसाठी “बहुमत” मिळत होते, तोपर्यंत ते “जनमत” होते… परंतु केंद्रात काँग्रेस सोडून इतर पक्ष म्हणून भाजपला “बहुमत” मिळायला लागल्यानंतर ते “जनमत” राहिले नसून तो काँग्रेसच्या मते “बहुसंख्यांकवाद” झाला आहे!!, हे जयराम रमेश यांनी काढलेल्या पत्रकातील भाषेवरून दिसून येते.
– जयराम रमेश यांचे पत्रक जसेच्या तसे :
Congress General Secretary in-charge Communications Jairam Ramesh issues a statement – “Congress has always been and will continue to be against ALL forms and types of communalism–majority, minority makes no difference.” Central Government banned #PFI for 5 years today.
त्याचबरोबर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देखील पीएफवाय संघटनेवरील बंदी नंतर विशिष्ट मत व्यक्त केले आहे. पीएफआय विरुद्ध आत्ताच पुरावे मिळाले का?? ती संघटना एका वर्षभरात पैदा झालेली नाही. पहिल्यापासूनच ती दहशतवादी संघटनांशी संलग्न होती, तर इतके वर्ष केंद्र सरकार काय करत होते??, असा सवाल कमलनाथ यांनी केला आहे. पण हा सवाल विद्यमान केंद्र सरकारला आहे की आधीच्या केंद्र सरकार पासून तो लागू होतो??, यावर खुलासा झालेला नाही.
जनता को सुरक्षा चाहिए। अगर इतने दिन से ये हो रहा था तो आप क्या कर रहे थे? ये साल भर में तो पैदा नहीं हुई। क्या सबूत अभी मिले हैं? अगर ये आतंकवादी संस्थाओं से पहले से जुड़ी थी तो आप इतने साल क्या कर रहे थे: PFI पर बैन को लेकर म.प्र. के पूर्व मुख्यमंत्री और कांग्रेस नेता कमलनाथ pic.twitter.com/U2Tdh4JOwb — ANI_HindiNews (@AHindinews) September 28, 2022
जनता को सुरक्षा चाहिए। अगर इतने दिन से ये हो रहा था तो आप क्या कर रहे थे? ये साल भर में तो पैदा नहीं हुई। क्या सबूत अभी मिले हैं? अगर ये आतंकवादी संस्थाओं से पहले से जुड़ी थी तो आप इतने साल क्या कर रहे थे: PFI पर बैन को लेकर म.प्र. के पूर्व मुख्यमंत्री और कांग्रेस नेता कमलनाथ pic.twitter.com/U2Tdh4JOwb
— ANI_HindiNews (@AHindinews) September 28, 2022
आतंकवादी गतिविधियों को रोकने के लिए सरकार कोई कदम उठाएगी तो हम सरकार का विरोध नहीं करेंगे लेकिन उस कदम में सच्चाई और ईमानदारी नजर आनी चाहिए। ये बैन आप पहले कर देते। इसकी डिमांड तो मैं पहले उठा चुका हूं। तो आप इतने दिन क्या कर रहे थे: PFI बैन पर राजस्थान के मंत्री प्रताप खचरियावास pic.twitter.com/TdMKB8HYby — ANI_HindiNews (@AHindinews) September 28, 2022
आतंकवादी गतिविधियों को रोकने के लिए सरकार कोई कदम उठाएगी तो हम सरकार का विरोध नहीं करेंगे लेकिन उस कदम में सच्चाई और ईमानदारी नजर आनी चाहिए। ये बैन आप पहले कर देते। इसकी डिमांड तो मैं पहले उठा चुका हूं। तो आप इतने दिन क्या कर रहे थे: PFI बैन पर राजस्थान के मंत्री प्रताप खचरियावास pic.twitter.com/TdMKB8HYby
कमलनाथ यांचे वक्तव्य जसेच्या तसे :
जनता को सुरक्षा चाहिए। अगर इतने दिन से ये हो रहा था तो आप क्या कर रहे थे? ये साल भर में तो पैदा नहीं हुई। क्या सबूत अभी मिले हैं? अगर ये आतंकवादी संस्थाओं से पहले से जुड़ी थी तो आप इतने साल क्या कर रहे थे: PFI पर बैन को लेकर म.प्र. के पूर्व मुख्यमंत्री और कांग्रेस नेता कमलनाथ
काँग्रेसचे दुसरे नेते आणि राजस्थान मधील मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थक प्रतापसिंह खाचरियावास यांनी पीएफआय वरील बंदी बाबत केंद्र सरकारच्या प्रामाणिकतेविषय शंका घेतली आहे. दहशतवादी कारवायांविरुद्ध सरकार पावले उचलत असेल तर काँग्रेस विरोध करणार नाही. पण त्यामध्ये प्रामाणिकता पाहिजे. पीएफआय सारख्या संघटनेवर पूर्वीच बंदी आणायला हवी होती. मग केंद्र सरकार इतके दिवस काय करत होते??, असा सवाल खाचरियावास यांनी केला आहे. त्यांचा सवाल देखील विद्यमान केंद्र सरकार बरोबरच आधीच्या केंद्र सरकारलाही लागू होत असल्याचे दिसत आहे!!
प्रतापसिंह खाचरियावास यांचे वक्तव्य जसेच्या तसे :
आतंकवादी गतिविधियों को रोकने के लिए सरकार कोई कदम उठाएगी तो हम सरकार का विरोध नहीं करेंगे लेकिन उस कदम में सच्चाई और ईमानदारी नजर आनी चाहिए। ये बैन आप पहले कर देते। इसकी डिमांड तो मैं पहले उठा चुका हूं। तो आप इतने दिन क्या कर रहे थे: PFI बैन पर राजस्थान के मंत्री प्रताप खचरियावास
काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्यांपासून निवडक नेत्यांपर्यंत या प्रतिक्रिया आहेत. यातले “बिटवीन द लाईन्स” वाचले तर काँग्रेसची मूलभूत भूमिका लक्षात येईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App