मायावतीच्या या विधानानंतर उत्तर प्रदेशचे राजकारण पुन्हा तापलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: समाजवादी पार्टी आणि बहुजान समाज पार्टी यांना एका व्यासपीठावर आणण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला आहे.Congress efforts to bring Akhilesh Yadav and Mayawati together
मायावती यांनी उत्तर प्रदेशच्या चर्चित गेस्ट हाऊस कांडच्या निमित्त अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीवर टीका केली आहे. याशिवाय त्यांनी ट्वीटद्वारे असेही सांगितले की, समाजवादी पार्टीकडून त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांना धोका असल्याचं म्हटलं आहे. मायावतीच्या या विधानानंतर उत्तर प्रदेशचे राजकारण पुन्हा तापलं आहे.
मायावती यांनी लिहिले, “समाजवादी पार्टी ही अतिमागासासंह दलितविरोधी पक्ष आहे. तथापि, बसपाने मागील लोकसभा निवडणुकीत सपाशी युती करून त्यांची दलितविरोधी नीती बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र सपा पुन्हा दलित विरोधी अजेंड्यावर आली.
आता समाजवादी पार्टी प्रमुख कुणाशीही आघाडीबाबत चर्चा करतात तेव्हा त्यांची पहिली अट बसपाला दूर ठेवण्याची असते. तसेही समाजवादी पार्टीच्या २ जून १९९५ सहित अन्य घृणास्पद कृत्यं पाहता. त्यांच्या सरकारमधील दलितविरोधी निर्णय दिसून येतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App