जातनिहाय राजकारण करून काँग्रेसचा हिंदुत्वावर वार; पण काँग्रेसचा ओबीसी विरोध “एक्सपोज” करून मोदींचा तगडा प्रहार!!

Congress attack on Hindutva by caste based politic

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : देशात हिंदुत्वाचे भरलेले वातावरण पाहून जातनिहाय राजकारणात शिरलेल्या काँग्रेसने हिंदुत्वावर वार केला, पण काँग्रेसचा ओबीसी विरोधी जाहीरनामा “एक्सपोज” करून पंतप्रधान मोदींनी काही पेक्षा प्रखर वार काँग्रेसवर केला. Congress attack on Hindutva by caste based politic

राम मंदिर बांधल्यानंतर देशात प्रचंड हिंदुत्वाचे वातावरण उभे राहिले. त्याला काटशह देण्यासाठी काँग्रेसने जातनिहाय जनगणना, संपत्तीचे फेरवाटप, जिसकी जितनी आबादी उतनी उसकी हिस्सेदारी वगैरे फंडे वापरून आपले राजकारण उभे केले. परंतु त्या राजकारणाला भेदण्यासाठी मोदींनी आदिवासी, ओबीसी एससी, एनटी हे सगळे हिंदुत्वाच्या नेट खाली आणले. इतकेच नाही, तर जातनिहाय राजकारणाच्या आडून काँग्रेस कसे अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करत आहे, ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देत आहे, सगळ्या मुस्लिमांचे ओबीसीकरण करत आहे, हेच काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या आरसा दाखवून जनतेसमोर “एक्सपोज” केले.

पंतप्रधान मोदींची गेल्या आठवड्याभरातली भाषणे त्याचीच निदर्शक ठरली. मोदींनी देशभरात आणि महाराष्ट्रात केलेल्या भाषणांमधून काँग्रेसने कर्नाटक आरक्षण प्रयोग कसा राबवला, ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना कसे दिले, याचे सविस्तर वर्णन केले. कर्नाटकात 2002 मध्ये सगळ्या मुसलमानांना काँग्रेसने ओबीसी कॅटेगिरीत आणून ठेवले. त्यामुळे ओबीसींच्या 27% आरक्षणात मुसलमानांचा स्वतंत्र वाटा तयार झाला आणि ओबीसींच्या हक्कांवर गदा आली. आज हे सगळे कारस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणांमधून जनतेसमोर मांडले.

काँग्रेस मोदींचा हिंदुत्वाचा अजेंडा उद्ध्वस्त करायला निघाली होती. परंतु, काँग्रेसलाच आपल्या जाहीरनाम्यातला हा अयब म्हणजे दोष दिसला नाही आणि नेमका तोच मोदींनी पकडून काँग्रेसला ते सगळीकडे धुवत चालले आहेत.

सोलापूरच्या आजच्या सभेत देखील पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचा कर्नाटक आरक्षण पॅटर्न “एक्सपोज” केला. उलट थेट पद्मशाली समाजाचे नाव घेऊन मोदींनी आपण पद्मशाली समाजाचे मीठ खाल्ले आहे. या सगळ्या समाजांना आपल्याला काहीतरी द्यायचे आहे म्हणून आपण अब की बार 400 पार हा आकडा मागतो आहोत, असे मोदी म्हणाले. त्याचवेळी त्यांनी देशातल्या आमदार खासदारांच्या संख्येत भाजपचे ओबीसी, बीसी, एससी, एनटी आदिवासी किती संख्येने मोठे आहेत, याचे देखील सविस्तर वर्णन केले. मोदींनी या सगळ्या प्रचारादरम्यान त्यांचा ट्रॅक बदलून काँग्रेसलाच बॅकफूटवर ढकलले.

Congress attack on Hindutva by caste based politic

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात