दिल्ली, पंजाब मध्ये आप कडून जागा मिळवण्यासाठी काँग्रेसचा गुजरातमध्ये “त्याग”; त्यामुळे अहमद पटेलांचा परिवार नाराज!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : INDI आघाडीत लोकसभेच्या जागावाटपाची प्रचंड घासाघीस सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधी काँग्रेसला झिडकारले, नंतर पश्चिम बंगाल मधल्या 42 पैकी फक्त 2 जागांवर बोळवण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी हे नाराज होऊन भाजपच्या वाटेवर निघाल्याची बातमी आहे. Congress and AAP announce seat-sharing for the upcoming Lok Sabha elections 2024.

त्यांच्या पाठोपाठ अखिलेश यादवांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसला 80 पैकी फक्त 17 जागा देऊन “गप्प” बसवले त्या पाठोपाठ दिल्लीत अरविंद केजरीवालांनी काँग्रेसला 3 जागा दिल्याचे बोलले गेले, पण प्रत्यक्षात तिथे काँग्रेसमध्येच नाराजी पसरली. पण त्या पाठोपाठ काँग्रेसने दिल्ली आणि पंजाब मध्ये आम आदमी पार्टीने आपल्याला काही जागा सोडाव्यात म्हणून गुजरातमध्ये “त्याग” केला. गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागांपैकी 2 जागा आम आदमी पार्टीला सोडून दिल्या. त्याची अधिकृत घोषणा गुजरात प्रभारी मुकुल वासनिक यांनी केली, पण गुजरात मधल्या ज्या 2 जागांचा “त्याग” काँग्रेसने केला आहे, त्यापैकी 1 जागा भरूच लोकसभा मतदारसंघाची म्हणजे सोनिया गांधींचे माजी राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची आहे.

अहमद पटेल यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा फैजल याने भरूच लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला होता. पण काँग्रेसने भरूच या जागेचा “त्याग” करून अहमद पटेल यांच्या परिवाराला नाराज केले आहे. अहमद पटेल यांच्या कन्येने परिवाराचे नाराजी उघडपणे बोलून दाखविली. अहमद पटेल यांनी भरूच लोकसभा मतदारसंघाचे दोनदा आणि गुजरात मधून राज्यसभेचे तीनदा प्रतिनिधित्व केले. त्यामुळे भरूच या जागेवर काँग्रेसचाच हक्क आहे. पक्षाने ही जागा आम आदमी पार्टीला सोडू नये. कारण भरूच लोकसभा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त एकाच मतदारसंघात आम आदमी पार्टीचा आमदार आहे, याकडे अहमद पटेल यांच्या कन्येने लक्ष वेधले. पण बाकीचे तिथले सगळे आमदार भाजपचे आहेत हे मात्र त्यांनी लपवून ठेवले.

पण काँग्रेसने मात्र भरूच आणि भावनगर या 2 जागांचा “त्याग” करून त्या आम आदमी पार्टीला दिल्या. त्या बदल्यात आता त्यांना पंजाब आणि दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीकडून काही जागांची अपेक्षा ठेवली, प्रत्यक्षात दिल्लीत आम आदमी पार्टीने 7 पैकी काँग्रेससाठी 3 जागा सोडल्या पण त्यासाठी काँग्रेसला गुजरात मध्ये “त्याग” करून अहमद पटेल यांचा परिवाराची नाराजी ओढवून घ्यावी लागली आहे.

Congress and AAP announce seat-sharing for the upcoming Lok Sabha elections 2024.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात