म्हणे, दिल्लीच्या तख्ताला तुतारीच्या आवाजाची “भीती”; पण “आवाज” दुसरीकडून नव्हे, तर तुतारीतूनच काढण्याच्या अटीशर्ती!!

Socail media trolls and counter trolls over sharad pawar's Trumpet symbol

विशेष प्रतिनिधी

मुंबई : म्हणे, दिल्लीच्या तख्ताला तुतारीच्या आवाजाची “भीती”; पण “आवाज” दुसरीकडून नव्हे, तर तुतारीतूनच काढण्याच्या अटी शर्ती!!, असे खरंच घडते आहे. Socail media trolls and counter trolls over sharad pawar’s Trumpet symbol

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्हाचे तीन पर्याय दिले होते, पण त्यामध्ये “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हाचा पर्याय नव्हता. निवडणूक आयोगाने पवारांच्या पक्षाने मागितलेल्या चिन्हांच्या ऐवजी त्यांना “तुतारी वाजवणारा माणूस” हे चिन्ह बहाल केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले जितेंद्र आव्हाड यांनी उत्साहात दिल्लीच्या तख्ताला तुतारीची भीती असे म्हणत “वाजवा तुतारी, गाडा गद्दारी”, असे ट्विट केले.


शरद पवार यांच्या पक्षाला मिळाले ‘तुतारीवाला माणूस’ हे नवे चिन्ह; केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा


परंतु भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच राष्ट्रवादी आणि अन्य पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पवार गटाची सोशल मीडियावर प्रचंड खिल्ली उडवली. तुतारी वाजेल की, हवा निघेल??, असा खोचक सवाल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला, तर त्यावर कडी करत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिले. आव्हाडांनी स्वतः तुतारी उचलून दाखवावी. स्वतः फुंकावी आणि 1 लाख रुपये घेऊन जावेत, पण अट एकच आहे, ती म्हणजे “आवाज” दुसरीकडून नव्हे, तर तुतारीतून निघाला पाहिजे, अशा शब्दांमध्ये अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाडांना आव्हान देत त्यांची खिल्ली उडवली.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारी चिन्ह दिले आहे. या तुतारी चिन्हाचे उद्या किल्ले रायगडावर अनावरण होणार आहे. यावेळी शरद पवार स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शरद पवार गटाने आता आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर उल्लेख केलेला राजकीय धुमाकूळ सध्या सोशल मीडियावर गाजतो आहे. शिवरायांना नमन करुन तुतारी वाजवत, रायगडावरुन सुरुवात करणार, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या तख्ताला भीती वाटणारा तुतारीचा आवाज असेल, असे आव्हाडांनी म्हटले.

त्यावर “एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन जी मी स्वप्राणाने… आमचं जितेंद्र आव्हाड यांना चॅलेंज आहे, त्यांनी तुतारी उचलून फुंकून दाखवावी, आपल्याकडून 1 लाखाचं बक्षीस घेऊन जावं. फक्त अट अशी आहे, आवाज तुतारीतून आला पाहिजे. तुतारीला कालपासून मार्केट आहे. पण हरकत नाही. विषारी तुतारी वाजवायला माणूस आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

Socail media trolls and counter trolls over sharad pawar’s Trumpet symbol

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात