मशाली पेटवा, नाहीतर तुताऱ्या वाजवा; महायुतीलाच मिळणार 45 जागा; नव्या चिन्हांची चंद्रकांतदादांनी उडवली खिल्ली!!


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर दोन्ही गोटांमध्ये प्रचंड उत्साह आला आहे. त्यातच आज शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण रायगडावर जाऊन केले. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उत्साहात फोटोसेशन करून घेतले. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ठाकरे – पवारांच्या पक्षांच्या नव्या चिन्हांची खिल्ली उडवली. तुम्ही मशाली पेटवा, नाहीतर तुताऱ्या वाजवा, महायुतीच मिळवणार 45 जागा!!, अशा शब्दांमध्ये चंद्रकांत दादांनी दोन्ही पक्षांच्या नव्या चिन्हांमधली हवा काढली. Chandrakant patil made fun of new symbols of thackeray and pawar parties

तुम्ही तुताऱ्या वाजवा नाहीतर; मशाली पेटवा. महाराष्ट्रात आम्ही पूर्वी 45 जागा जिंकणार म्हणत होतो. पण, आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही तो आकडाही क्रॉस करू, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविला. यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाचा हवाला दिला महायुतीला 44% मते मिळू शकण्याचा आकडा या सर्वेक्षणाने समोर आणला आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लोकसभेला महायुती तब्बल 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढत आहे. मोदी हे जात, पात, धर्म, गट यांच्या पुढे गेले आहेत. मोदींनी लाभार्थी नावाचा गट निर्माण केला आहे आणि तो असा म्हणतो की, विरोधी पक्षांचे राजकारण आता बस्स झाले. आम्हाला फक्त मोदी पाहिजे. त्याचा प्रत्यय आता दिसत आहे.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका, तीन राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले. मध्य प्रदेशच्या इतिहासात भाजपला प्रथमच एवढे मोठे यश मिळाले आहे. ‘हमको लाभ मिला है, तुम्हे जो करना, है तो करो’. पण, निवडणुकीत शेवटपर्यंत विरोधी पक्षाने हार मानायची नसते, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना दिला.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल बोलायला मी ज्योतिषी नाही. पण, महाविकास आघाडीत समाधानाचे वातावरण दिसत नाही. मात्र त्याकडे आम्ही बघत नाही. याउलट महायुती मजबूत होत चालली आहे. कालचा जो रिपोर्ट आहे, त्यात भाजपला 36 % मते दाखविल्या आहेत. सहयोगी पक्षांसोबत 44 % टक्क्यांपर्यंत मतांचा आकडा जात आहे. आमच्या महायुतीच्या मतांचा आकडा 44 % पर्यंत गेला, तर आम्हाला 48 जागा मिळायला पाहिजेत.

पण उद्धव ठाकरे यांच्या मशालीला जर तेल मागितले, तर भाजप देईल का?? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी सावध भूमिका घेतली. त्यांनी मशालीला तेल मागणे, न मागणे हे जर – तरचे विषय आहेत. पण, तुम्ही तुताऱ्या वाजवा, नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात महायुतीच 45 जागा क्रॉस करेल, असा दावा चंद्रकांतदादांनी केला.

Chandrakant patil made fun of new symbols of thackeray and pawar parties

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात