तुतारी चिन्ह अनावरणात रायगडावर फोटोसेशन; पवार गटाच्या नेत्यांची फोटोत येण्यासाठी धांदल!!


विशेष प्रतिनिधी

रायगड : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला “तुतारी वाजवणारा माणूस” हे निवडणूक चिन्ह बहाल केल्यानंतर उत्साह संचारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडावर तुतारी चिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम घेतला, पण या कार्यक्रमामध्ये फोटोसेशन करण्यातच पवारांच्या पक्षाने धन्यता मानली. त्यामुळे शरद पवारांबरोबर आणि तुतारी बरोबर फोटोसेशन करण्यात नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धांदल उडाली. Photo session at Raigad at the unveiling of Tutari sign

शरद पवार तब्बल 40 वर्षांनी आज रायगडावर पोहोचले, ते देखील स्वतःच्या पक्षाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण करण्यासाठी. याचा अर्थ शरद पवार गेल्या 40 वर्षात रायगडाकडे फिरकलेही नव्हते.

रोप वे ने शरद पवार रायगडावर पोहोचले. त्यानंतर डोलीत बसून त्यांनी कार्यक्रम स्थळ गाठले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीपाशी तुतारी चिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी नेत्यांमध्ये फोटोसेशन करून घेण्यासाठी झुंबड उडाली. जयंत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच सूत्रसंचालक पदाची सूत्रे हाती घ्यावी लागली आणि नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शिस्त लावावी लागली.

प्रथम शरद पवारांच्या समवेत तुतारी वादकांचे फोटो सेशन झाले. नंतर आमदार खासदारांचे फोटोसेशन झाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे फोटो सेशन झाले. पण पण हे फोटोसेशन करताना कोणी पुढे यायचे, कुणी मागे थांबायचे, कोणी व्यासपीठावर चढायचे, कोणी खाली उतरायचे या सूचना जयंत पाटलांना वारंवार द्याव्या लागत होत्या. फोटोसेशन झाल्यानंतर शरद पवार सभास्थळी रवाना झाले. पण मुळातल्या तुतारी चिन्ह अनावरण कार्यक्रमांमध्ये सुसूत्रतेचा अभाव दिसला.

Photo session at Raigad at the unveiling of Tutari sign

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात