विशेष प्रतिनिधी
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतातल्या आणि जगातल्या वेगवेगळ्या समूहांशी संपर्क परिचय आणि दृढ संपर्क या त्रिसूत्रीच्या आधारे वाटचाल सुरू केली आहे. संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी परवाना भवन मध्ये जाऊन कॉम्रेड ए. बी. वर्धन यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. Comrade A. B. Vardhan to Dr. Tribute to Mohan Bhagwat
कम्युनिस्टांबरोबर संघाचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी भागवतांची सौजन्यशील वर्तणूकच यातून समोर आली. त्यामुळे सध्याच्या टोकाच्या राजकीय मतभेदाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या भुवया उंचावल्या.
परवाना भवन ही वेगवेगळ्या डाव्या संघटनांच्या कार्यालयांची इमारत आहे. तेथे एका परिसंवादात डॉ. मोहन भागवत सहभागी झाले. त्यादरम्यानच त्यांनी काँग्रेस ए. बी. वर्धन यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
1925 हे संघाचे शताब्दी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर संघ वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये आपला परिचय वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर संपर्क, परिचय आणि दृढ संपर्क अशी त्रिसूत्री सध्या संघाने अवलंबली आहे. त्यातूनच आपल्या वैचारिक विरोधकांची संपर्क ठेवणे, वाढविणे आणि वैचारिक मतभेद टिकूनही आपली वर्तणूक सौजन्यशील असू शकते हे उदाहरण संघाला घालून द्यायचे आहे. सामाजिक समता आणि समरसता ही मूल्य जपताना त्यामध्ये मतभेदांचे स्थान जसे मोठे आहे, तसेच समन्वयाचे स्थानही तितकेच मोठे आहे, हे संघाला यातून अधोरेखित करायचे आहे, असे संघाच्या एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने सांगितले.
संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांनी अनेकदा हिंदू धर्मातल्या सुधारणांसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. संघाची वैचारिक विरोधकांकडे पाहण्याची दृष्टी इतरांपेक्षा वेगळी आहे हेच यातून सांगायला दाखवून द्यायचे असल्याचे ज्येष्ठ स्वयंसेवकांचे म्हणणे आहे.
मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांतराची लाट सुरू असताना संघाने त्यांच्या आरक्षणाला विशिष्ट भूमिकेतून विरोध केला होता, पण नव बौद्धांना आरक्षण देण्यासाठी संघाने कधीच विरोध केला नाही. उलट १९९० मध्ये संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत ठराव करून त्या आरक्षणाचे समर्थनच केले होते, याची आठवण या स्वयंसेवकाने करून दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App