विशेष प्रतिनिधी
मुंबई : बाळासाहेबांची खुर्ची, विचार, आत्मा आणि वारशाची खेचाखेच मुंबईत सुरू आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच भोवती सगळे विषय फिरत आहेत. shivsena dasara melava 2023
शिवसेनेच्या शिंदे गटाने आझाद मैदानावरच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अखेरच्या भाषणाची खुर्ची मुख्य स्थानी ठेवली आहे. बाळासाहेबांचा प्रखर हिंदुत्वाचा खरा विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. आम्हीच बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारस आहोत. शिवाजी पार्कवर नावाचेच ठाकरे आहेत, असा टोला रामदास कदम आणि गुलाबराव पाटलांनी आझाद मैदानावरून हाणला.
या टोल्याला शिवाजी पार्क वरून प्रत्युत्तर देण्यात आले. बाळासाहेबांची खुर्ची तुम्ही तिकडे ठेवू शकाल. अशा अनेक खुर्च्या मिळतात. बाळासाहेबांनी अनेक खुर्च्या वापरल्या पण बाळासाहेबांच्या विचारांचा आणि रक्ताचा वारसा आमच्याकडे आहे, शिवाजी पार्कवरच बाळासाहेबांचा आत्मा आहे, असे उत्तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. मुंबईच्या जनतेचा हितासाठी महापालिकेने ठेवी ठेवल्या त्याच्यावर शिंदे – फडणवीस सरकार डल्ला मारत आहे, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र करणे सुरू आहे. नाशिकचे पालकमंत्री झोपा काढत होते म्हणून ट्रक्स हजारो कोटींची ट्रक्स नदीत लपवली गेली, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
पण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भाषणे सुरू होण्यापूर्वी दोन्ही गटांमध्ये बाळासाहेबांची खुर्ची, आत्मा, विचार आणि वारशाची खेचाखेच या भोवतीच दसरा मेळावा फिरला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App