वृत्तसंस्था
रायपूर : प्रधानमंत्री आवास योजनेवरुन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. केंद्राने या योजनेचा २०२१-२०२२ साठीचा राज्याचा प्रलंबित निधी वितरित केला नाही, त्याऐवजी योजनेचे लक्ष्य पूर्ण न केल्याबद्दल छत्तीसगड सरकारलाच लक्ष्य केले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. CM Bhupesh Baghel erupts on central govt
या योजनेत छत्तीसगडची कामगिरी खराब असल्याचे सांगत केंद्राने योजनेचा राज्याचा निधी परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बघेल म्हणाले, या योजनेला पंतप्रधानांचे नाव दिले आहे तर केंद्र व राज्यात निधीचे वाटप अनुक्रमे ६०:४० या प्रमाणात का, योजनेचा पूर्ण निधी केंद्र सरकारने द्यायला हवा. निधी उपलब्ध होताच गरीबांसाठी पुन्हा घरे बांधण्यास सुरूवात करू.
केंद्राने उत्पादन शुल्कातील तसेच जीएसटीतील वाटा राज्याला न देण्याचा मुद्दा आम्ही सातत्याने उपस्थित करत आहोत. ही प्रलंबित रक्कम जवळपास २२ हजार कोटी आहे. छत्तीसगडमध्ये कोळसा खाणीची परवानगी दिलेल्या खाणमालकांकडून वसून केलेला ४,१४० कोटींचा दंडही केंद्राने राज्य सरकारला अद्याप दिलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more