गोळीबार सुरूच, अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचे वृत्त Clash between police and Naxalites in Chhattisgarhs Bijapur four Naxalites killed
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली.मंगळवार सकाळी झालेल्या या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही चकमक विजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरचोली आणि लेंद्राच्या जंगलात झाली. यावेळी पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना ठार केले. तसेच अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलीस कर्मचारी अजूनही जंगलात उपस्थित असून शोध मोहीम राबवत आहेत. या नक्षलविरोधी कारवाईवर डीआयजी आणि एसपी लक्ष ठेवून आहेत. मात्र या चकमकीत किती लोक मारले गेले याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
या चकमकीत डीआरजी, सीआरपीएफची कोब्रा बटालियन आणि बस्तर फायटर्स, बस्तारिया बटालियन आणि सीएएफ जवानांची संयुक्त टीम सहभागी झाली होती. या पथकाने नक्षलविरोधी मोहीम राबवत जंगलात शोधमोहीम सुरू केली. दरम्यान नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. कोरचोली आणि लेंद्राच्या जंगलात गांगलूर एरिया कमिटीमध्ये ही चकमक झाली. सुरक्षा दलांनीही नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत चार नक्षलवाद्यांना ठार केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more