112 उमेदवारांना मिळाली संधी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आज भाजपने राज्यातील 112 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीसाठी 4 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा 23 मेपासून सुरू होत असून त्यात 28 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. BJP announced the list of candidates for the Odisha assembly elections
या यादीत भाजपने गोवर्धन भुये यांना पदमपूरचे उमेदवार केले आहे. त्याचवेळी बिजेपूरमधून सनत कुमार यांना संधी देण्यात आली आहे. अश्विनी कुमार सारंगी यांना बारगढमधून संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अट्टाबिरा (SC)मधून निहार रंजन महानंदा, भाटलीमधून इरेसिस आचार्य, ब्रजराजनगरमधून सुरेश पुजारी आणि झारसुगुडामधून टंकधर त्रिपाठी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय अन्य मतदारसंघामध्ये उमेदवार घोषित केले आहेत.
बीजेडी पक्षाचे ओडिशात 2000 पासून वर्चस्व आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालांसोबतच जाहीर होतील. नवीन पटनायक यांच्या पक्ष बीजेडीनेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more