बारामतीत नणंद भावजयीचा लढा, फक्त नव्हे काका – पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला; तर अख्ख्या पवार कुटुंबाच्या राजकारणाभोवती आवळलेला तिढा!!


नाशिक : बारामतीत नणंद – भावजयीचा लढा; फक्त नव्हे पवार काका – पुतण्याची प्रतिष्ठा पणाला, तर अख्ख्या पवार कुटुंबाच्या राजकारणाभूती आवळलेला तिढा…!!, हे खरे बारामतीच्या लढाईचे स्वरूप आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कोणत्याही “पवारच” निवडून येणार असल्या, तरी अजित पवार किंवा शरद पवारांना ही लढत आपल्या घरातच फूट पाडून यशस्वी करावी लागणार आहे. अजित पवारांना तर ही फूट वरवरची राखताच येणार नाही. कारण त्यांना राज्य सरकारमध्ये प्रवेश देणारा भाजप नावाचा पक्ष ते सहन करणार नाही. Fight in baramati more important for ajit pawar’s political future than sharad pawar

शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तसेच विजय शिवतारे यांनी शिंदे – फडणवीसांच्या शिष्टाईनंतर माघार घेतल्यानंतरच अजितदादांनी “सेफ गेम” करत सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता सुनेत्रा पवारांचा बारामतीत “पार्थ पवार” होऊ नये याची काळजी घेण्याचे सर्वांत मोठे आव्हान अजितदादांना “स्वबळावर” पेलावे लागणार आहे. आता त्यासाठी त्यांना काकांची मदत मिळणार नाही. पण त्याचबरोबर काकांनाही आपल्या मुलीला निवडून आणण्यासाठी पुतण्याची मदत मिळणार नाही.

पण त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचा राजकीय परिणाम संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या राजकीय भूगोलावर होणार आहे, तो म्हणजे अजितदादांना बारामती लोकसभा मतदारसंघात आता खऱ्या अर्थाने बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. त्यांना आता पूर्वी सारखा हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, बाबा जाधवराव, संग्राम थोपटे आदी नेत्यांना त्रास देऊन चालणार नाही, तर उलट या सगळ्या नेत्यांना आपल्या राजकारणात सामावून घ्यावे लागणार आहे. अन्यथा भाजप तो त्रास बिलकूल सहन करणार नाही.



त्याचा परिणाम पुणे जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रावर निश्चित होणार आहे. हर्षवर्धन पाटलांचे महत्त्व त्या दृष्टीने फार मोठे आहे. हर्षवर्धन पाटलांसह अन्य नेत्यांना त्रास देणे इथून पुढच्या राजकारणात अजित पवारांना शक्य होणार नाही. किंबहुना तसा त्रास देणे अजितदादांनाच घातक ठरण्याची दाट शक्यता आहे.

पूर्वी पवार काका – पुतणे एकाच पक्षात असताना पुणे जिल्ह्याचे राजकारण ते मनःपूत हाकू शकत असत. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, बाबा जाधवराव यांच्यासारख्या नेत्यांना भाजप आणि शिवसेनेचा आश्रय घ्यावा लागला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेने या नेत्यांना बळ दिले, पण भाजप आणि शिवसेना मर्यादेच्या पलीकडे या नेत्यांना यशस्वी करू शकले नाहीत. कारण पवार काका – पुतण्यांच्या एकत्रित ताकदीपुढे भाजपची त्यावेळची ताकद कमी पडली होती. आता परिस्थिती तशी उरलेली नाही भाजप राजकीय सामाजिक आणि आर्थिक ताकद बिलकुलच काका पुतण्यापेक्षा कमी नाही. उलट शेरास सव्वाशेर, खरेतर तर शेरास दीड – दोन शेर अशी भाजपची ताकद वाढली आहे.

त्यामुळे भाजपशी त्या पक्षाच्या गोटात जाऊन “गद्दारी” करणे अजित पवारांना शक्य होणार नाही आणि तसे त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे “अत्यंत गंभीर परिणाम” त्यांना भविष्यात भोगावे लागतील. अजितदादांच्या “गद्दारीमुळे” बारामतीचे सीट कदाचित गमावली जाईल, पण त्यामुळे केंद्रातल्या मोदींच्या सत्तेवर तसूभरही परिणाम होणार नाही.

… आणि केंद्रात मोदींची सत्ता आली आणि बारामतीतली एक खासदारकी केवळ “गद्दारीमुळे” गमावली असली चूक अजितदादांना त्यांच्या भविष्यातल्या संपूर्ण राजकारणासाठी महागात पडू शकते. किंबहुना ती चूक संपूर्ण पवार परिवाराच्या राजकारणासाठी महागात पडू शकते, हे अजितदादांना विसरून चालणार नाही. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी व्यक्तींची लढाई वाटत असली, तरी प्रत्यक्षात ती अजित पवार आणि शरद पवार यांच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यापेक्षाही ती अजितदादांच्या राजकीय भवितव्याची खरी लढाई आहे, ही बाब अधोरेखित केली पाहिजे.

बारामतीत सुप्रिया पवार पडल्या, तर पवारांची राजकीय कारकिर्दीची अखेर पराभवाने होईल. पण सुनेत्रा पवार पडल्या, तर एकाच वेळी काका – पुतण्या या दोघांचीही कारकीर्द संपेल. कारण भाजप अजित पवारांचा पराभव इतक्या सहजतेने किंवा हलक्यात घेणार नाही. संपूर्ण पवार परिवाराला धडा शिकवल्याशिवाय मोदी – शाहांच्या भाजपचे नेते गप्प बसणार नाहीत.

Fight in baramati more important for ajit pawar’s political future than sharad pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात