वृत्तसंस्था
चंदिगड : बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपची नवनिर्वाचित खासदार कंगना रनोट यांना गुरुवारी चंदीगड विमानतळावर एका महिला कॉन्स्टेबलने कानशिलात लगावली. कंगना म्हणाल्या, सुरक्षा तपासणीवेळी CISF कॉन्स्टेबलने माझ्यावर हल्ला केला. तथापि, सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिला निलंबित करून चौकशीचे आदेश दिले. गुन्हाही दाखल केला. CISF woman constable suspended for planting in MP Kangana Ranot’s ear
शेतकरी आंदोलनावेळी कंगना यांनी शेतकऱ्यांविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे कुलविंदर नाराज होती. दरम्यान, एका व्हिडिओत कंगना म्हणाल्या, मी सुरक्षित आहे. मात्र, पंजाबात वाढणाऱ्या दहशतवादाचा सामना कसा करता येईल, याची मोठी चिंता आहे.
‘माझी आई उपोषणाला बसली, कंगना बसेल?’
कंगना यांच्या कानशिलात लगावल्यानंतर कुलविंदरचा व्हिडिओ समोर आला. यात ती म्हणत आहे, 100 रुपयांत लोक शेतकरी आंदोलनात उतरल्याचे कंगना म्हणाली होती. माझी आईही उपोषणाला बसली होती. कंगना तिथे बसेल का?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App