विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : अफगाणिस्तान हा देश पुन्हा दहशतवादाचा अड्डा बनता कामा नये असा इशारा चीनने तालिबानला दिला आहे. तालिबान खुले आणि सर्वसमावेशक इस्लामी सरकार स्थापन करेल अशीही आशा आहे. China warns Taliban on terrorism issue
संयुक्त राष्ट्रेच्या (यूएन) सुरक्षा परिषदेच्या पार पडलेल्या बैठकीत चीनचे उपप्रतिनिधी गेंग शुआंग यांनी याविषयी परखड भाष्य केले. ते म्हणाले की, अफगाणिस्तानात दहशतवाद पोसला जाता कामा नये हाच निर्णायक मुद्दा असेल. अफगाणिस्तानमध्ये भविष्यात कोणताही राजकीय तोडगा काढताना याविषयी ठाम राहावेच लागेल. तालिबान त्यांच्या आश्वासनांवर ठाम राहिली आणि त्याची कळकळीने पूर्तता करेल आणि दहशतवादी संघटनांबरोबर स्पष्टपणे फारकत घेईल अशी अपेक्षा आहे.
अफगाणिस्तानात अनागोंदी निर्माण झाल्यामुळे त्याचा गैरफायदा उठविण्यासाठी इस्लामिक स्टेट (आयएस), अल््-कायदा आणि इटीआयएम (पूर्व तुर्किस्तान इस्लामी चळवळ) अशा संघटना प्रयत्न करतील, असे नमूद करून शुआंग यांनी सांगितले की, या संघटनांना रोखण्यासाठी खंबीर कृतीची गरज आहे. त्यासाठी सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायदा आणि सुरक्षा परिषदेच्या ठरावांबाबत बंधनकारक असलेल्या करारांची पुर्तता करावी.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App