Chief Minister Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय राजधानीच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान निवासस्थानी योगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटू शकतात. मोदींशी भेट घेतल्यानंतर ते दुपारी 12 वाजता भाजपध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतील. यूपीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. Chief Minister Yogi Adityanath Visits Amit Shah, Also going to Meet PM Modi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय राजधानीच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान निवासस्थानी योगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटू शकतात. मोदींशी भेट घेतल्यानंतर ते दुपारी 12 वाजता भाजपध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतील. यूपीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मोदी-शाह यांच्या भेटीत यूपीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा तसेच उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींबाबतही चर्चा होऊ शकते.
उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्ली पहुंचेंगे, वो कल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात कर सकते हैं। — ANI_HindiNews (@AHindinews) June 10, 2021
उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्ली पहुंचेंगे, वो कल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात कर सकते हैं।
— ANI_HindiNews (@AHindinews) June 10, 2021
एक दिवसापूर्वीच उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे नेते जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील वर्षी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार असल्याने योगींचा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) बीएल संतोष आणि पक्षाचे प्रदेश प्रभारी राधामोहन सिंह यांनी लखनऊ येथे भेट दिली होती आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला होता.
Chief Minister Yogi Adityanath Visits Amit Shah, Also going to Meet PM Modi
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App