mayor kishori pednekar says action taken against convicted in mumbai building collapse

Mumbai Building Collapse : महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या- दोषींवर कडक कारवाई होणार, इमारत मालक -कंत्राटदारावर गुन्हा दाखल

Mumbai Building Collapse : मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मालवणी परिसरातील चार मजली इमारत (Mumbai Four Story Building Collapses) कोसळल्याच्या दुर्घटनेवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) म्हणाल्या की, अवैध बांधकामाची पाहणी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. कडक कारवाईचे संकेत देत असतानाच त्या म्हणाल्या की, दोषींचा शोध घेतला जात आहे. mayor kishori pednekar says action taken against convicted in mumbai building collapse


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मालवणी परिसरातील चार मजली इमारत (Mumbai Four Story Building Collapses) कोसळल्याच्या दुर्घटनेवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) म्हणाल्या की, अवैध बांधकामाची पाहणी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. कडक कारवाईचे संकेत देत असतानाच त्या म्हणाल्या की, दोषींचा शोध घेतला जात आहे.

महापौर पेडणेकर म्हणाल्या की, बीएमसी आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत त्यांच्याकडून पूर्ण माहिती देण्यात आली होती. दुसरीकडे मलाड पश्चिमचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण अहो. ते म्हणाले की, एक G+2 इमारत दुसऱ्या इमारतीवर पडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू (11 Died In Building Collapses) झाला.

इमारत मालक आणि कंत्राटदारावर गुन्हा

दिलीप सावंत म्हणाले की, 18 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलीप सावंत म्हणाले की, पोलीस या प्रकरणाची योग्य चौकशी करत असून त्याच आधारे पुढील कारवाई केली जाईल. ज्वाइंट सीपी विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, इमारत मालक आणि ठेकेदाराविरुद्ध भादंवि कलम 304 (2) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, नुकत्याच आलेल्या तौकते चक्रीवादळानंतरच इमारतीच्या स्ट्रक्चरमध्ये काही बदल करण्यात आले होते.

mayor kishori pednekar says action taken against convicted in mumbai building collapse

महत्त्वाच्या बातम्या